मुंबई : सुंदर दिसावे असे प्रत्येकीला वाटते. त्यासाठी आपण सगळ्याजणी प्रयत्नशील असतो. मग त्यासाठी ब्युटी पार्लरच्या पायऱ्या झिजवतो, मेकअप, कॉस्मेटिकमध्ये पैसे खर्च करतो. पण या झाल्या वरवरच्या गोष्टी. तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुमची त्वचा देखील चमकदार राहते. मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागते. म्हणून आरोग्यदायी असणं महत्त्वाचं. यासाठी काही आरोग्यदायी संकल्प.
मानसिक आरोग्य आणि सुंदरता या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. राग. ईर्ष्या, गर्व किंवा नकारात्मकता मनात असेल तर ते चेहऱ्यावर प्रतिबिंबीत होते. त्याचबरोबर ताण, तणाव, नैराश्य, चिंता यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. तसंच त्यामुळे त्वचेच्या काही समस्या देखील उद्भवतात. म्हणून मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे आहे. नवीन वर्षात यासाठी सतत प्रयत्नशील रहा.
तुम्हाला आनंद देणारी चांगली कामे करा. तुमचे छंद जोपाला. नवीन ठिकाणी फिरायला जा. त्यामुळे तुमचे मन आनंदी होईल आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसेल.
ध्यानामुळे तुमचे मन शांत होईल. राग, द्वेष. भीती, चिंता दूर होऊन मानसिक संतुलन साधण्यास मदत होईल. सकारात्मकता वाढीस लागेल.
वरील सर्व मुद्दांवरून आपल्या मनाचे व सौंदर्याचे जवळचे नाते आहे, हे स्पष्ट झाले. म्हणून मनाचे स्वास्थ्य राखण्यासाठी तुम्हाला सात्विक आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असं म्हणतात, यथा अन्नम् तथा मनम्. म्हणून फळे, भाज्या, पालेभाज्या, सुकामेवा यांसारख्या सात्विक आहारामुळे तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. परिणामी तुम्ही सुंदर दिसाल. म्हणून शक्यतो सात्विक अन्नाचा आहारात समावेश करा.