हिवाळ्यात आरोग्यास लाभदायक हेल्थ ड्रिंक्स

परतीच्या पावसानंतर आता थंडी हळू-हळू डोकंवर काढत आहे. 

Updated: Dec 18, 2019, 07:51 PM IST
हिवाळ्यात आरोग्यास लाभदायक हेल्थ ड्रिंक्स title=

मुंबई : परतीच्या पावसानंतर आता थंडी हळू-हळू डोकंवर काढत आहे. हवामानात होत असलेल्या बदालाचा परिणाम आरेग्यावर होत असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात काही बदल करा. थंडीपासून बचावण्यासाठी काही हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्सचा आहारातील समावेश वाढवा.  

हळदीचं दूध - सर्दी, खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी 'हळदीचं दूध ' घ्यावं. हळदीचं गरम दूध शरीरात उष्णता निर्माण करण्यास तसेच रोगप्रतिकारशक्तीला चालना देण्यास मदत करतात.  

मसालेदार चहा - हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी मसाले चहा किंवा गरम मसाल्याचा वापर करून तयार केलेला काढा / चहा फायदेशीर आहे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. 

सूप - हिवाळ्याच्या दिवसात शरीरात उष्णता टिकून राहण्यास आणि वारंवार लागणार्‍या भूकेला नियंत्रणात ठेवण्यासाठी सूप हा हेल्थी पर्याय आहे. तसेच सूप झटपट तयार होत असल्याने त्याचा आहारात हमखास समावेश करा.  

हर्बल कॉफी - कॅफिनचा शरीरात अधिक प्रमाणात मारा झाल्यास आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी हर्बल कॉफीचा पर्याय निवडा.