Weight Loss : वजन कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा, जिममध्ये जाण्याची गरज नाही !

 Weight Loss Tips : तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही व्यायामाशिवायही वजन कमी करु शकता? येथे आम्ही तुम्हाला असे काही सोपे मार्ग सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करुन तुम्ही तुमचे वजन सहज कमी करु शकता. 

Updated: Aug 17, 2022, 11:57 AM IST
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा, जिममध्ये जाण्याची गरज नाही ! title=

मुंबई : Weight Loss Tips : तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही व्यायामाशिवायही वजन कमी करु शकता? येथे आम्ही तुम्हाला असे काही सोपे मार्ग सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करुन तुम्ही तुमचे वजन सहज कमी करु शकता. 

व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाण्यासाठी वेळ काढणे थोडे कठीण जाते. (Weight Loss Tips Without Exercis) त्याचवेळी वजन कमी करणे हे एका मोठ्या मानसिक आणि शारीरिक आव्हानापेक्षा कमी नाही. कारण व्यायामासाठी वेळ काढणे अनेकांना जमत नाही. असे असले तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे. तरच तुम्ही फिट राहू शकाल. एक विशिष्ट दिनचर्या आणि एकत्र कमी खाणे कठीण वाटते, पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही व्यायाम न करताही वजन कमी करू शकता. मग तुम्हाला यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण जाईल. पण आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्याचा अवलंब करुन तुम्ही तुमचे वजन सहज कमी करु शकता.  

आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा -

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला वजन का कमी करायचे आहे आणि तुमचे ध्येय काय आहे हे समजून घेतले पाहिजे. जर तुमचे वजन खूप वाढले असेल, तुमचे शरीर हालचाल करु शकत नसेल, तर तुम्ही तुमच्या रोजच्या अन्नपदार्थांच्या जागी आरोग्यदायी गोष्टी घेऊ शकता. दुसरीकडे, जर तुम्ही जंक फूड खात असाल तर ते खाण्याऐवजी, तुम्ही स्नॅक म्हणून फळे खाऊ शकता. असे केल्याने तुम्हाला खूप बदल जाणवेल.

थोडे थोडे जेवण करा -

वजन कमी करण्यासाठी तुम्ही उपाशी राहून वजन कमी करु शकता, असा विचार तुम्ही करत असाल. पण असे केल्याने वजन तर कमी होईलच पण त्याचवेळी पाणी कमी होईल, त्यामुळे दिवसातून तीन वेळा खात असाल तर ते 5 वेळा खा. असे केल्याने तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होईल.

सकाळी मेथीचे पाणी प्या.

एक ग्लास पाण्यात दोन चमचे मेथीचे दाणे भिजवून गाळून सकाळी उपाशीपोटी अर्थात काहीही न खाता प्या. कारण मेथीचे दाणे कार्बोहायड्रेट चयापचय वाढवण्यास मदत करतात आणि पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते. याच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)