जिने चढ उतार करताना वेदना असह्य होतात, या 5 घरगुती उपायांनी कमी होईल गुडघेदुखी

Knee Pain Relief Tips: सांधेदुखी ही समस्या हल्ली प्रत्येकालाच जाणवते. अशावेळी या काही घरगुती उपायांचा वापर तुम्ही करु शकता 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 21, 2024, 01:11 PM IST
जिने चढ उतार करताना वेदना असह्य होतात, या 5 घरगुती उपायांनी कमी होईल गुडघेदुखी title=
health tips in marathi Best Home Remedies for Knee Pain Relief

Knee Pain Relief Tips: साधारण वय वाढल्यानंतर सांधेदुखीची समस्या वाढीस लागते. वयाच्या पन्नाशीनंतर गुडघेदुखी डोकं वर काढते. मात्र हल्ली शरीरात व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि आयर्नची कमतरता असल्यासही गुडघेदुखी सुरू होते. त्याचबरोबर एखादी जखम झाल्यास किंवा मार लागल्यास मसल्स किंवा टिश्यूजला त्रास होतो त्यामुळं सांधेदुखी होऊ शकते. तुम्हालादेखील गुडघेदुखीने हैराण झाले असेल तर हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा. त्यामुळं तुमच्या गुडघेदुखीवर तात्काळ आराम मिळले. तसंच, हे घरगुती उपाय सोपे व झटपट होणारे आहेत. 

गुडघेदुखीवर घरगुती उपाय 

आल्याचा चहा 

अँटी इंफ्लेमेटरी गुणांनी भरपूर असलेल्या आल्याचे सेवनाने सांधेदुखीवर आराम मिळतो. तसंच, त्यामुळं वेदनादेखील कमी होतात. पाण्यात आल्याचे छोटे छोटे तुकडे करुन एक उकळी घ्या. 10 मिनिटांनंतर हे पाणी चांगले गाळून त्यात थोडे मध आणि लिंबाचा रस मिसळून घ्या. आता हा चहा दिवसातून 2 ते 3 वेळा प्यायल्यास वेदनेवर आराम मिळतो. 

लिंबूदेखील फायदेशीर 

गुडघेदुखीवर लिंबूदेखील रामबाण ठरु शकतो. लिंबाच्या सेवनाने एक फायदा मिळतो तो म्हणजे तिळाचे तेल गरम करुन त्यात लिंबू पिळून घ्या. त्यानंतर त्यानंतर हे मिश्रण गुडघ्यांवर लावून घ्या. एक किंवा दोन लिंबू कापून एका सूती कपड्यात बांधून ठेवा. आता हा कपडा तिळाच्या तेलात ठेवा आणि 5 ते 10 मिनिट जिथे वेदना होत आहेत त्या ठिकाणी बांधून ठेवा. दिवसातून 2 वेळा हा घरगुती उपाय केल्यास गुडघेदुखी पासून आराम मिळतो. 

हळद आहे फायदेशीर 

औषधी गुणांनी युक्त असलेल्या हळदीचे सेवन केल्यास किंवा गुडघ्यांवर हळदीचा लेप लावल्यास वेदनांवर आराम मिळतो. हळदीत आढळणारे अँटी इंफ्लेमेटरी केमिकल करक्यूमिन आणि अँटी ऑक्सीडेंट गुण गुडघेदुखीवर आराम देतात. अर्धा चमचा आले किसून त्यात अर्धा चमचा हळदी मिसळा आणि पाण्यात टाकून 10 मिनिटे शिजवून घ्या. या चहामध्ये थोडे मध टाकून दिवसातून दोनदा हे मिश्रण प्या. यामुळं वेदनादेखील कमी होतील. हळदीमध्ये सरसो किंवा तिळाचे तेल मिसळून एक पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट गुडघ्यांवर लावा. 

तुळशीचा चहा

तुळशीचा वापर आयुर्वेदिक औषधी म्हणूनही केला जातो. तुळशीची काही पाने 10 मिनिटे पाण्यात टाकून उकळवून घ्या. हा चहा रोज 3 ते 4 वेळा प्यायल्यास गुडघेदुखीवर आराम मिळतो. 

कॅस्टर ऑइल 

सांधेदुखी दूर करण्यासाठी कॅस्टर ऑइलचा वापर केला जातो. कॅस्टर ऑइलला 2-3 चमचे थोडेसे गरम करुन गुडघ्यांना लावा. या तेलाची हलकी मॉलिश केल्यास वेदनेपासून आराम मिळतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)