होळी, धुळवड हे फक्त सण नाहीत तर याचा थेट परिणाम आरोग्याशी, होतील जबरदस्त फायदे

Holi Health Tips : होळी या सणाबाबत लोकांमध्ये खास उत्साह पाहायला मिळतो. होळी आणि धुळवड या दोन्ही सणांसाठी अनेक लोक उत्साही असतात. तुम्हाला माहित आहे का? हे दोन्ही सण अगदी थेट तुमच्या आरोग्याशी निनगडीत आहेत. कसे ते जाणून घ्या. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 21, 2024, 05:03 PM IST
होळी, धुळवड हे फक्त सण नाहीत तर याचा थेट परिणाम आरोग्याशी, होतील जबरदस्त फायदे  title=

होळी हा रंग आणि आनंदाचा सण आहे. कुटूंब एकत्र येऊन हा दिवस साजरा करताना दिसतात. पण काही लोक मात्र होळी खेळण्याऐवजी घरी बसणे पसंत करतात किंवा अतिशय दूर ठिकाणी निघून जातात. तर अशा लोकांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की, रंगांचा आपल्या मानसिकतेशी खूप मोठा संबंध आहे ? धुळवडीत उधळले जाणारे रंग लाल, निळा, पिवळा, हिरवा, गुलाबी आपल्याला आनंदी आणि सकारात्मकतेसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. खरं तर हाच धुलिवंदन हा सण साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. 

रंग वातावरण प्रसन्न करतात आणि उत्सवाची मोहकता वाढवतात. रंग आपल्या विचार, कृती आणि भावनांवर प्रभाव टाकण्यास मदत करतात. आजकाल मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी कलर थेरपीची मदत घेत आहेत. 

मानसिक आरोग्यावर रंगाचा प्रभाव

स्मरणशक्ती सुधारते

अनेक संशोधनांनुसार, रंग आपली स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवतात. प्रत्येक रंगाचे वेगळे महत्त्व आहे. धुलिवंदनाच्या दिवशी या रंगाच्या संपर्कात आल्यावर त्याची सकारात्मकता तुमच्यात निर्माण होते.

आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात

रंगांनी वेढलेले असल्यामुळे शरीरात आनंदी संप्रेरके बाहेर पडतात, ज्यामुळे तुम्हाला आनंदी आणि आराम मिळतो. मन मोकळं झालं की उत्पादकता वाढते. यामुळे शारीरिक स्वास्थ्यही सुधारते. आनंदी राहून तुम्ही अनेक आजारांचा धोका दूर करू शकता.

तणाव दूर होतो

वर नमूद केल्याप्रमाणे, रंग मनाला आराम देतात, त्यामुळे तणाव आणि नैराश्यासारख्या समस्या दूर राहतात. तणाव, लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या धोकादायक आजारांच्या यादीत याचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे दीर्घकाळ सुरू राहणे कोणत्याही प्रकारे चांगले नाही. डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार, 'वेगवेगळे रंग वेगवेगळ्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात, जसे लाल रंग अतिशय तीव्र भावनांचे प्रतीक आहे. निळा रंग आपल्याला थंडपणा देतो आणि मनात शांततेची भावना निर्माण होतो. तर पिवळा रंग आनंदाचे प्रतीक आहे.

मानसिक आरोग्यावर परिणाम

होळीच्या रंगांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम हा आनंद, उत्सव आणि सांस्कृतिक संबंधांच्या बाबतीत अनेकदा दिसून येतो. होळीच्या सणात सहभागी होण्याने सकारात्मक भावनांना चालना मिळते, ज्यामुळे अनेक व्यक्तींच्या सर्वांगीण कल्याणासाठी हातभार लागतो. होळीच्या सणामध्ये रंग आणि प्रियजनांचा सहवास यामुळे एकटेपणा आणि चिंता यांसारख्या समस्याही दूर होतात, त्यामुळे हे सर्व फायदे लक्षात घेऊन यावेळी होळी खेळण्याची संधी सोडू नका.