या घरगुती हेअर मास्कने अवघ्या काही दिवसात केस होतील चमकदार

​लांंबसडक आणि काळेभोर केस मिळवण्यासाठी स्त्रिया अनेक ब्युटी ट्रीटमेंंट्स, शाम्पूची निवड करतात. 

Updated: Jul 8, 2018, 05:52 PM IST
या घरगुती हेअर मास्कने अवघ्या काही दिवसात केस होतील चमकदार  title=

मुंबई : ​लांंबसडक आणि काळेभोर केस मिळवण्यासाठी स्त्रिया अनेक ब्युटी ट्रीटमेंंट्स, शाम्पूची निवड करतात. मात्र त्यानुसार अपेक्षित निकाल मिळतीलच अशी खात्री नसते. आजकालच्या धावपळीच्या युगात केसांच्या आरोग्याकडे लक्ष देणं कठीण होत चाललं आहे. मजबूत आणि दाट काळेभोर केस वाढवण्यासाठी काही घरगुती उपायदेखील फायदेशीर ठरतात. मग केसांचं आरोग्य जपण्यासाठी असाच एक सहजसोपा घरगुती हेअर मास्क फायदेशीर ठरतो. यामुळे केसांना नैसर्गिकरित्या चकाकी मिळण्यास मदत होते. लहान वयात केस पांढरे होत असतील तर करा हे उपाय

केसगळती, स्प्लिट एन्ड्स, अकाली केस पांढरे होणं अशा समस्या आजकाल हमखास जाणवतात. केसांच्या आरोग्यासाठी आहारात आवश्यक पोषक घटकांंचा समावेश करणं आवश्यक आहे. मात्र त्यासोबतीने काही घरगुती उपाय केल्यास केसांना पुन्हा मजबुती मिळण्यास मदत होते. केस पांढरे होण्यामागची ही आहेत ५ कारणे 

कसा बनवाल घरगुती हेअर मास्क ? 

हेअर मास्कसाठी 250 ग्राम दह्यामध्ये 2 चमचे कोरफडीचा गर, 2 अंडी मिसळा. हे मिश्रण नीट एकत्र करून हेअर मास्क बनवा. 

तयार हेअर मास्क टाळूवर नीट लावा. हलक्या हाताने मसाज करा.

हा हेअर मास्क सौम्य शाम्पूच्या मदतीने स्वच्छ करावा. 

हा मास्क नियमित आठवड्यातून दोनदा लावल्यास केसांचं आरोग्य सुधारते. सोबतच ते अधिक मुलायम होतात.