थायरॉईडच्या रूग्णांंना त्रासदायक ठरतात हे '6' पदार्थ !

थायरॉईडचा त्रास हा हार्मोन्सच्या कार्यामध्ये बिघाड झाल्याने वाढतो. 

Updated: Jul 8, 2018, 03:41 PM IST
थायरॉईडच्या रूग्णांंना त्रासदायक ठरतात हे '6' पदार्थ !  title=

मुंबई : थायरॉईडचा त्रास हा हार्मोन्सच्या कार्यामध्ये बिघाड झाल्याने वाढतो. हा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी त्याचे वेळीच निदान होणं आवश्यक आहे. सोबतच थायरॉईडचा त्रास नेमका कशाचा आहे हे समजल्यानंतर औषधोपचाराच्या सोबतीने आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं आवश्यक आहे. मग पहा थायरॉईच्या रूग्णांनी आहारात नेमके कोणते पदार्थ खाणं टाळाल ? 

थायरॉईडच्या रूग्णांनी काय खाणं टाळावं ? 

थायरॉईडचा त्रास असणार्‍यांनी आहारात बेकरी प्रोडक्ट्सचे पदार्थ टाळावेत. यामध्ये बिस्किट, खारी, टोस्ट, ब्रेड यांचं सेवन टाळावे. 

थायरॉईडच्या रूग्णांनी आहारात कॅफिनयुक्त पेयांचा समावेश टाळावा. चहा, कॉफी अशा कॅफीनयुक्त पदार्थांनी अनेक आजारांचा धोका वाढतो. सोबतच कॅफिनयुक्त पदार्थांमुळे औषाधांचा परिणाम कमी होतो. 

थायरॉईडच्या रूग्णांनी आहारात नारळ, शेंगदाणा यांचा समावेश टाळावा. 

तळकट आणि मसालेदार पदार्थांचा आहारातील समावेश टाळावा. चिप्स, समोसा,पकोडे अशा पदार्थांमुळे तोंडाला पाणी सुटत असले तरीही यावर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे.  

लॅक्टोज, अतिसाखरयुक्त पदार्थ, हाय फ्रूक्टोज़ कॉर्न सिरपयुक्त पदार्थ आहारात टाळावेत. यामुळे थायरॉईडच्या रूग्णांना त्रास होऊ शकतो. 

मद्यपान, धुम्रपानाची सवयदेखील थायरॉईडच्या रूग्णांना त्रासदायक ठरते. थायरॉईडचा त्रास आटोक्यात आणतील हे ४ घरगुती उपाय!