'हा' भयंकर त्वचारोग तुम्हाला तर नाही ना?

खाज येणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारोग आपल्याला ठाऊक आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 10, 2018, 09:29 PM IST
'हा' भयंकर त्वचारोग तुम्हाला तर नाही ना? title=

मुंबई : खाज येणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारोग आपल्याला ठाऊक आहेत. मात्र या त्वचा रोगांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण त्वचेत हे रोग मुळ ठरू लागते. आणि त्यानंतर कितीही उपाय केले तरी तो त्रास पुन्हा पुन्हा होऊ लागतो. यामध्ये सतत खाज येते. अन् खाजवल्याने काळे डाग पडतात, त्याला एक्जिमा म्हणतात. हे अधिकतर गुप्तांगात होते.

लक्षण

त्वचेवर लाल डाग, खाज, जळजळ होते. संपूर्ण शरीरावर एक्जिमा होते. तसंच ताप येतो.

कारण

ही समस्या साधारणपणे केमिकलयुक्त पदार्थ म्हणजे साबण, चूना, सोडा, डिटर्जेंट यांसारख्या पदार्थांच्या अधिक वापरामुळे होते. त्याचबरोबर मासिक पाळीत अस्वच्छता, बद्धकोष्ठता आणि रक्त विकार यामुळे हा त्रास उद्भवू शकतो. तसंच खाज, खजूली असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, त्यांचे कपडे वापरल्यास हा त्रास होण्याची शक्यता असते.

कोणती काळजी घ्यावी?

  • साबण, शॅम्पू आणि डिटर्जंटचा वापर बंद करा. अंघोळीसाठी ग्लिसरीन सोप चा वापर करा.
  • अंघोळीनंतर नारळाचे तेल लावा.
  • अंटी फंगल क्रिमचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. ते लावणे बंद केल्यास त्रास अधिक बळावतो.
  • कपड्यांवर साबण किंवा डिटर्जंट लावल्यानंतर ते स्वच्छ धुवा. त्यावर साबण किंवा डिटर्जंटचा अंश राहता कामा नये. कपडे नीट सुकू द्या.
  • मीठ खाणे बंद किंवा कमी करा.

सामान्यतः या त्रासावर केले जाणारे घरगुती उपाय

  • समुद्राच्या पाण्याने अंघोळ केल्याने एक्जिमाच्या रुग्णाला फायदा होतो.
  • कडूलिंबाची पाने पाण्यात घालून उकळवा आणि त्या पाण्याने अंघोळ करा.
  • डाळिंबाच्या पानांची पेस्ट लावा.
  • केळ्याच्या गरात लिंबाचा रस घालून ते मिश्रण खाज येणाऱ्या जागी लावा.
  • किसलेल्या गाजरात सेंधव मीठ घाला आणि ते कोमट करून त्या जागी लावा.
  • कच्च्या बटाट्याचा रस लावा.
  • सिंगाडात लिंबाचा रस घालून लावा.
  • हळदीचा लेप लावणेही फायदेशीर ठरेल.
  • ओवा पाण्यात उकळवा आणि त्या पाण्याने ती जागा धुवा.
  • कडूलिंबाचा रस प्या.
  • दूधात गुलकंद घालून प्या.
  • कडूलिंबाची पाने वाटून त्यात दही घालून ती पेस्ट खाज येणाऱ्या जागी लावा.
  • झेंडूची पाने पाण्यात उकळवून त्याची पेस्ट लावणे देखील उपयुक्त ठरेल.

पिकल्यावर काय करावे?

त्रिफळा कढई किंवा तव्यावर गरम करा. गरम करताना त्यावर झाकण ठेवा. त्यानंतर त्यात तूप, फटकी घालून त्याची पेस्ट बनवा आणि ती संबंधित जागी लावा.