मुंबई : सध्या स्ट्रेट हेअरचा ट्रेंड आहे. हेअर स्ट्रेट करण्यासाठी अनेक उपकरने बाजारात उपलब्ध आहेत. परंतू त्या उपकरनांमुळे केसांचे नुकसान देखील होते. त्याचप्रमाणे यासाठी लोकं महागडे ट्रीटमेंट करतात. पण घरातही तुम्ही आता स्ट्रेट करू शकता. हे उपाय केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.
व्हिनेगर : केसांना शैम्पू केल्यावर कंडिशनर करा. कंडीशनरनंतर गार पाण्यात व्हिनेगरचे काही थेंब टाकावे त्यानंतर केस धुवावे.
केळी आणि मध : दोन केळी बारीक करून त्यात २ चमचे मध, २ चमचे ऑलिव्ह तेल आणि २ चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट आपल्या पूर्ण केसांवर लावून शॉवर कॅपने केस कव्हर करा. अर्ध्या तासाने केस धुऊन टाका.
एरंडेल तेल : गरम एरंडेल तेल ने मालीश करा. नंतर गरम टॉवेलने केसांना वाफ द्या आणि ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्यात धूवा.