close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सुंदर दिसण्यासाठी लसून एकमेव उपाय

जाणून घ्या फायदे...

Updated: Sep 14, 2019, 07:37 AM IST
सुंदर दिसण्यासाठी लसून एकमेव उपाय

मुंबई : आता सर्वच महिला त्याचप्रमाणे पुरूष देखील सतत आकर्षक आणि उठाव दिसण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात. त्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधने देखील बाजारात उपलब्ध आहेत. परंतू हे रसायन मिश्रीत प्रसाधने काहींच्या त्वचेला घातक ठरतात. त्यामुळे अशा व्यक्तिंच्या त्वचेसाठी लसून एकमेव उपाय आहे. 

स्ट्रेच मार्क्स दूर होतात : अनेकांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स असतात. हे स्ट्रेच मार्क्स लठ्ठपणामुळे, आनुवंशिकता किंवा इतर कारणांमुळे शरीरावर येत असून ते लवकर जात नाही. लसणाचा रस काढून हा रस ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळा. हे मिश्रण गरम करा आणि थंड झाल्यानंतर ते स्ट्रेच मार्क्सवर लावून मसाज करा. दररोज हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवू शकतो.

चेहऱ्यावरील मुरूम दूर होतात : लसूण घासून त्याचा रस काढून घ्या आणि हा रस चेहऱ्यावरील मुरुमांवर लावा. ५ मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या. या उपायाने तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.