मुंबई : मानेवर, चेहऱ्यावर हातावर येणारी चामखीळ वेदनाविरहित असली तरी दिसायला मात्र वाईट दिसते. यापासून मुक्तता मिळवण्यासाठी लेझर सर्जरी आणि डर्मोटॉलॉजिकल ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, चामखीळ पासून मुक्तता मिळवण्याचे काही नैसर्गिक उपाय देखील आहेत. जाणून घेऊया त्या उपायांबद्दल.
केळ्याच्या सालीमुळे चामखीळमुळे होणारा त्रास कमी होतो व इतर जागी त्याचा संसर्ग होण्याला आळा बसतो. केळ्याची साल चामखिळीवर बँड एड प्रमाणे रात्रभर गुंडाळून ठेवा. उत्तम परिणामांसाठी हा उपाय काही दिवस करत रहा.
कांद्याचा उपयोग चामखीळ दूर करण्यासाठी होतो. विशेषतः व्हायरल इन्फेकशन मुळे आलेल्या चामखिळीवर हा उपाय अतिशय फायदेशीर आहे. H K Bakhru यांच्या पुस्तकात असे लिहिले आहे की कापलेला कांदा चामखीळ वर लावल्याने फायदा होतो. कारण त्यात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टरील कंपाऊंडस असतात.
चामखीळवर अंजीराचा झाडाचा latex लावणे हा अतिशय परंपरागत चालत आलेला उपाय आहे. यासाठी फक्त छोटासा latex चामखिळीवर लावा आणि याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.