डेंगीच्या तापावर आराम देतील हे '७' घरगुती उपाय!

मौसम बदलताच डासांचा त्रास वाढू लागतो.

Updated: Jul 27, 2018, 09:21 AM IST
डेंगीच्या तापावर आराम देतील हे '७' घरगुती उपाय!

मुंबई : मौसम बदलताच डासांचा त्रास वाढू लागतो. पावसाळ्यात तर ही समस्या अगदी हमखास उद्भवते. अशावेळी डेंगू, चिकनगुनिया यांसारखे आजार वाढू लागतात. पण आपण सुरक्षित राहावे, असे प्रत्येकाला वाटते. डासांना पळवून लावतील हे घरगुती उपाय!

पण डासांच्या प्रादुभावामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवणे इतके सोपे नाही. त्याचबरोबर त्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करणे कठीण काम आहे. डेंगू झालेल्या रुग्णाला सांधेदुखीचा त्रास उद्भवतो. त्याचबरोबर डोके दुखते आणि शरीरातील प्लेटलेट्सची संख्या प्रचंड कमी होते. पण घरातील काही गोष्टींचा वापर करुन डेंगूच्या डासांपासून सुटका मिळवू शकतो. डेंगीचा 'ताप' यंदा वाढण्याची शक्यता, व्हायरसचं नव रूप अधिक धोकादायक

नारळपाणी 

डेंगूच्या तापावर आराम मिळवण्यासाठी नारळपाणी प्या. यातील पोषकतत्त्व म्हणजेच मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाईट्स शरीर मजबूत करण्यास मदत करतात. डेंगीच्या या '5' गोष्टींंबाबत वेळीच व्हा सावध !

तुळशीची पाने

तुळशीची पाने गरम पाण्यात उकळवून घ्या आणि ते पाणी प्या. असे केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. हे पाणी तुम्ही दिवसातून चार वेळा पिऊ शकता.

मेथीची पाने

डेंगीच्या तापावर मेथीची पाने घालून बनवलेला चहा फायदेशीर ठरतो. असे केल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात आणि डेंगूवर आराम मिळतो.

पपईची पाने

डेंगीवर पपईची पाने खूप परिणामकारक आहेत. यातील पपेन शरीराचे पचनतंत्र सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर पपईचा ज्युस प्यायल्याने प्लेटलेट्स जलद गतीने वाढण्यास मदत होते.

काळीमिरी

तुळशीची पाने आणि काळीमिरी पाण्यात उकळवा आणि ते पाणी प्या. त्यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते. त्याचबरोबर हे पाणी अॅंटी बॅक्टेरिअल म्हणून काम करते.

भोपळ्याचा रस

भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्युसमध्ये दोन चमचे मध घालून दिवसातून दोनदा प्या. प्लेटलेट्सची संख्या वाढण्यास मदत होते. 

गाजर आणि बीट

बीटामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. दोन ते तीन चमचे बीटाचा रस ग्लासभर गाजराच्या रसात मिसळून प्या. ब्लड प्लेटलेट्स जलद गतीने वाढण्यास मदत होते. ताप नेमका डेंगी की चिकनगुनियाचा, हे कसं ओळखाल?