अशाप्रकारे मिल्क पावडरने मिळवा तजेलदार त्वचा...

 उन्हाळा नुकताच संपला. पण उन्हाळामुळे निर्माण झालेल्या त्वचेच्या समस्या अजूनही कायम असतील. 

Updated: Jun 12, 2018, 12:25 PM IST
अशाप्रकारे मिल्क पावडरने मिळवा तजेलदार त्वचा... title=

मुंबई : उन्हाळा नुकताच संपला. पण उन्हाळामुळे निर्माण झालेल्या त्वचेच्या समस्या अजूनही कायम असतील. टॅनिंग, पिंपल्स, पिंगमेंटेशन, ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्यांनी त्रासले असाल तर एक फेसपॅक अत्यंत फायदेशीर ठरेल. खरंतर बाजारात अनेक फेसपॅक्स, मास्क आणि पील्स उपलब्ध असतात. पण त्यात असलेल्या केमिकल्समुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. पण नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी फेसपॅक तयार केल्यास त्वचेला फायदा होऊ शकतो. यासाठी मिल्क पावडरने असे बनवा फेसपॅक्स...

# मुलतानी माती चेहऱ्याच्या देखभालीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. विशेषतः ऑयली त्वचेसाठी ती अतिशय फायदेशीर ठरते. यासाठी मुलतानी माती आणि मिल्क पावडर समान प्रमाणात घ्या. त्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. गुलाबपाण्याचे काही थेंब घाला. चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

# निस्तेज त्वचेवर तजेला आणण्यासाठी चमचाभर मिल्क पावडरमध्ये दोन चमचे लिंबाचा रस घाला. पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. सुकल्यावर पाण्याने स्वच्छ धुवा. नियमित हा उपाय केल्याने चेहरा चमकदार होईल.

# पिंपल्सने त्रासले असाल तर मिल्क पावडरमध्ये मध आणि गुलाबपाणी घाला. पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

# केसर असल्यास मिल्क पावडरमध्ये मिसळा आणि पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहार स्वच्छ करा.