दूध कधी पिणं ठरेल आरोग्याला अधिक फायदेशीर?

दूधाला पूर्णअन्न समजले जाते. 

Updated: Jul 12, 2018, 02:43 PM IST
दूध कधी पिणं ठरेल आरोग्याला अधिक फायदेशीर?  title=

मुंबई : दूधाला पूर्णअन्न समजले जाते. आरोग्यासाठी दूध हे आवश्यक आहे. दूधात कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांच्या मजबुतीसाठी दूध आवश्यक आहे. त्यामुळे लहानमुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रकृतीनुसार दूधाचे सेवन फायदेशीर ठरते. 

क्वचित तुमची जेवणाची किंवा नाश्त्याची वेळ टळली तर तुम्ही आहारात दूधाचा समावेश करू शकता. मात्र दूधासोबत काही पदार्थ खाणं हे आरोग्याला त्रासदायक ठरू शकत असल्याने नेमक्या कोणत्या वेळी आणि कसा दूधाचा आहारात समावेश करावा याबाबतचा हा एक्सपर्ट सल्ल नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरणार आहे.   दूध गरम प्यावे की थंडगार  

कधी आणि कसं प्याल दूध ? 

1. पालक अनेकदा मुलांना आंघोळ किंवा प्रातः विधीच्या पूर्वीच दूध प्यायला देतात. यामुळे दूध पचायला त्रास होऊ शकतो. प्रयत्न असा करा की दूध हे आंघोळीनंतरच प्यावे. 

2. उन्हाळ्याव्यतिरिक्त रात्री  झोपण्यापूर्वी दूध पिणं टाळा. थंड दूध पिण्याचे हे आहेत फायदे

3.दूधासोबत कोणतेही आंबट फळ मिसळू नका. यामुळे त्रास होऊ शकतो. गॅसचा त्रास होतो. संत्र, पपई, स्ट्रॉबेरीचं दूधासोबत सेवन टाळा. 

4. खोकला, सर्दी, कफाचा त्रास असल्यास रात्रीच्या वेळेस किंवा थंड दूध पिणं टाळा. दुधात गूळ मिसळून पिण्याचे जादुई फायदे 

5. ज्यांना दूध पिण्याचा त्रास असतो, पचायला त्रास होत असेल तर अशांनी डॉकटरांच्या सल्ल्यानेच दूध प्यावे. दूधात सुंठ मिसळून प्यावे. यामुळे त्रास कमी होईल. 

6. रात्रीच्या वेळेस जेवण थोडं कमी जेवून त्यानंतर दीड ते दोन तासांनी ग्लासभर दूध प्यावे. 

7. सकाळी आंघोळीनंतर आणि संध्याकाळच्या वेळेस दूध पिणं अधिक आरोग्यदायी आहे. त्यामुळे संध्याकाळी मुलं खेळून आल्यानंतर अभ्यासाला बसण्यापूर्वी त्यांना ग्लासभर दूध द्या. 

8. रात्रीच्या वेळेस दूध प्यायचे असेल तर जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ याचं गणित सांभाळा. रात्रीच्या जेवणानंतर 2 तासांनी दूध प्या.