मुंबई : मानसिक आजारांसंदर्भात (Mental health) अजूनही आपल्याकडे म्हणावी तशी जागृती नाही. डोळसपणे बघितल्यास 5 पैकी एका व्यक्तीला कुठल्यातरी प्रकाराचा मानसिक आजार असल्याचं आढळून येईल. डिप्रेशन (Depression) आणि ताण-तणाव (Stress) यांसारखे आजार हल्ली तरुणांमध्येही आढळून येतात. डिप्रेशन ही समस्या 11 ते 15 या वयोगटातील मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ज्यांना अशा प्रकारची समस्या जाणवत असेल त्यांनी तातडीनं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मात्र असं होताना दिसत नाही.
काही लोकांना मानसिक आजारांचं समस्यांचं गांभीर्य लक्षात येतं, मात्र समाज काय म्हणेल या भितीने ते उपचार घ्यायला धजावत नाहित. शिवाय काही लोकांना या विषयी या समस्या मांडायला लाज वाटते.
डिप्रेशन, स्क्रिझोफ्रेनिया, बायोपोलार डिसॉर्डर किंवा पॅनीक डिसॉर्डर अशा मानसिक आजारांमुळे रोजच्या जीवनात अनेक व्यत्यय निर्माण होतात. याचा परिणाम एकाग्रतेवरवरही होतो. तसंच, या आजारांमुळे निर्णयक्षमताही कमी होते. त्यामुळे मनाची अस्वस्थता न लपवता तज्ज्ञांकडून औषधोपचार करुन घेणं गरजेचं असतं.
मानसिक आजारांसाठी योग्य प्रकारे उपचार न घेतल्यास, या समस्या आणखी बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणेच औषधोपचार घेणं गरजेचं आहे.
मानसिक आजारांवर करण्यात येत असलेल्या उपचारांच्या काही पद्धती खालीलप्रमाणे आहेत.
औषधोपचार हा मानसिक रूग्णांसाठी प्रारंभीचा टप्पा मानला जातो. औषधोपचारांमुळे रुग्णांच्या चिंता तसेच मानसिक आजाराची लक्षणं कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अशा रूग्णांना डॉक्टरांकडून औषधं दिली जातात.
ग्रुप थेरेपी उपचारांच्या माध्यमातून रूग्णांना त्यांना असणाऱ्या समस्येविषयी मोकळेपणाने बोलता येते.
या थेरेपीच्या माध्यमातून त्या रूग्णाच्या वैयक्तिक समस्यांची उत्तर मिळण्यास मदत होते. तसेच तज्ज्ञांद्वारे रूग्णांशी चर्चा करून आजारांचे मुख्य कारण शोधले जाते.
फॅमिली थेरेपी ही मनोरूग्णासाठी फार उपयुक्त थेरेपी मनली जाते. या थेरेपीच्या माध्यमातून कुटुंबातील लोकांकडून रूग्णाचं आजारावर मात करण्याच्या बाबतीत मनोबल वाढवलं जातं.