वारंवार फेशिएल करणं त्वचेसाठी हानीकारक

  एखाद्या खास कार्यक्रमासाठी तयार होताना अनेकजणी 'फेशिअल'चा पर्याय निवडतात. 

Updated: Nov 29, 2017, 02:09 PM IST
वारंवार फेशिएल करणं त्वचेसाठी हानीकारक  title=

मुंबई :  एखाद्या खास कार्यक्रमासाठी तयार होताना अनेकजणी 'फेशिअल'चा पर्याय निवडतात. 

'फेशिअलमुळे चेहर्‍याला ग्लो मिळतो, त्वचेवरील मृत त्वचा, ब्लॅक हेड्सचा त्रास कमी होतो तरीही यामध्ये काही छुपे धोकेदेखील आहेत. म्हणूनच वारंवार 'फेशिएल'करण्याआधी हा खास सल्ला नक्की जाणून घ्या. 

 

लालसर त्वचा 

फेशिएलमुळे त्वचा लालसर होणं अगदीच सामान्य आहे. ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स काढण्यासाठी त्वचेवर सूयांचा वापर केला जातो. परिणामी त्वचेवर सूज, लालसरपणा दिसतो.

 

स्कार्स किंवा इंफेक्शन 

 त्वचेवरील छिद्र मोकळी करण्यासाठी ज्या टूल्सचा वापर करतात त्यामुळे त्वचेच्या बाहेरील त्वचेचे नुकसान होऊ शकते. अनेकदा फेशिअल करणार्‍यांचे हात अस्वच्छ असतील तर त्यामुळेदेखील नुकसान होते. 
 
 फेशिएल करणारी व्यक्ती प्रोफेशनल नसेल तर त्वचेला तुम्ही नकळत धोक्यात घालता. अनेकदा त्वचेवर स्कार्स दिसतात.  

 
 त्वचेवरील शुष्कता 

 
 फेशिएलनंतर त्वचेवरील बाहेरील स्तराचे नुकसान होते तसेच ती अधिक शुष्क होते. त्यामुळे फेशिएलनंतरही त्वचेला मॉईश्चरायझर लावण्याची सवय ठेवा.  

 
 दोन फेशिएलमध्ये किती दिवसाचा काळ असावा ? 

 
 किशोरवयीन मुला मुलींनी फेशिएल घरच्या घरीच  करावे. चांगल्या दर्जाचे क्लिंन्जिंग वापरावे. म्हणजे तुम्हांला दर महिन्याला फेशिएल करण्याची गरज नाही. 
 
१८-२२ वर्षीय तरूणींनी ८-१० आठवड्यांच्या फरकाने फेशिएल करावे. जसजसे तुम्ही तिशीचा टप्पा पार करता तसा तुम्हांला  महिन्यातून एकदा फेशिएअल करावे लागते. 

२-३ आठवड्यातून एकदा फेशिएअल करण्याची सवय त्वचेला त्रासदायक ठरू शकते.