महत्त्वाची बातमी! Whatsapp वरून बुक करता येणार Vaccine Appointment

आता Cowin आणि आरोग्य सेतूला करा Bye Bye! Whatsapp वरून थेट बुक करा Vaccine Appointment...कशी करायची ते पाहा व्हिडीओ

Updated: Aug 24, 2021, 04:12 PM IST
महत्त्वाची बातमी! Whatsapp वरून बुक करता येणार Vaccine Appointment title=

मुंबई: लस बूक करायची म्हणजे डोक्याला ताप कारण कोव्हिन असो किंवा आरोग्य सेतू स्लॉट मिळताना मारामार. रांगेत उभं राहावं तरी लस संपली म्हणून पुन्हा घरी पाठवून दिलं जातं. या सगळ्या परिस्थितीमध्ये काय करायचं हे सूचत नाही. आता केंद्र आणि राज्य सरकारनं लसीकरण मोहीम वेगानं वाढवली आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित केलं जात आहे.

Whatsapp वर लस घेतल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट मिळत होतं. मात्र आता तुम्हाला घरबसल्या लसीची अपॉइंटमेंटही बुक करता येणार आहे. खरंच यासंदर्भात मायगोव इंडिया या ट्वीटर अकाऊंटवरून व्हिडीओद्वारे माहिती देण्यात आली आहे. 

माइगोव कोरोना हेल्पडेस्क तुम्हाला आता Whatsapp वरून लसीची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी तुम्हाला एका नंबरवर मेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्राची माहिती देण्यात येईल. तुम्ही तुमचा नंबर अपलोड करून ओटीपी द्यायचा आहे. तुमचं लोकेशन निवडायचं आणि तिथल्या जवळच्या केंद्रावर तुम्ही अपॉइंटमेंट बुक करायची आहे. 

5 ऑगस्टपासून मायगोव्ह आणि व्हॉट्सअॅपने युझर्ससाठी चॅटबॉटमधून लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत, देशभरातील 32 लाखांहून अधिक नागरिकांनी प्रमाणपत्रे डाउनलोड केली आहेत. त्यामुळे आता बुकिंग अपॉइंटमेंटचा फायदाही देशातील अनेक नागरिकांना होणार आहे.