डेंग्यू,मलेरिया झाल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कसे वाढवाल? जाणून घ्या

बकरीचे दुध, नारळ पाणी आणि पपईच्या पानांचा रसाने खरचं शरीरात प्लेटलेट्स वाढतात का? 

Updated: Sep 16, 2022, 10:32 PM IST
डेंग्यू,मलेरिया झाल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कसे वाढवाल? जाणून घ्या title=

मुंबई : पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचे रुग्ण झपाट्याने वाढतात. या आजारांवर जर वेळीच उपचार न केल्यास ते जीवघेणेही ठरू शकतात. डेंग्यूमध्ये शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. हे प्लेटलेट्स वाढण्यासाठी अनेकदा घरगुती उपायांचा वापर केला जातो. यामध्ये बकरीचे दुध, नारळ पाणी आणि पपईच्या पानांचा रसांचा प्लेटलेट्स वाढण्यासाठी वापर केला जातो.मात्र याचा खरचं फायदा होता ते जाणून घेऊयात. 

बकरीचे दुध
डेंग्यूमध्ये शेळीचे दूध फायदेशीर आहे. त्यामुळे प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात. शेळीच्या दुधात व्हिटॅमिन बी 12, बी 6, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी कमी असते. शेळीचे दूध पचायला सोपे आणि रक्तपेशी वाढवते. त्यात एक विशेष प्रोटीन असते जे प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करते.

नारळ पाणी 
डेंग्यूमुळे शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळाच्या पाण्यात असे अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. मात्र, डेंग्यूमध्ये नारळपाणी प्यायल्याने प्लेटलेट्स वाढते, असे तथ्य समोर आले नाही.

पपईच्या पानांचा रस
डेंग्यू आणि मलेरियामध्ये जेव्हा शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊ लागतात तेव्हा लोक पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि पपेन नावाचे संयुग असते, जे प्रथिने पचण्यास मदत करते. पपईच्या पानांमध्येही फ्लेव्होनॉइड्स असतात. हे सर्व पोषक तत्व शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करतात.

(वरील बातमीची झी 24 तास खातरजमा करत नाही. माहिती सर्वसामान्य संदर्भाच्या आधारे घेण्यात आली आहे.)