मुंबई : ओठ हा अत्यंत नाजूक अवयव आहे. सौंदर्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे चेहर्याप्रमाणेच ओठांची काळजी घेणं आवश्यक आहे. ओठांचा काळसरपणा वाढण्यामागे वातावरणातील काही गोष्टी जितक्या आवश्यक असतात तितक्याच आपल्या काही सवयीदेखील कारणीभूत ठरतात.
ओठ काळे होण्यामागे डेड स्किन म्हणजेच मृत त्वचादेखील आहे. सतत ओठांना जीभ लावण्याची तुमची सवय ओठांमधील मुलायमपणा कमी होतो. त्यामुळेही ओठांवरील त्वचा काळवंडू शकते.
ब्रशच्या मदतीने ओठांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी मदत होते.
ग्लिसरीन आणि लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण एका बाटलीत मिसळा. नियमित त्याचा वापर करा. या मिश्रणामुळेही ओठांवरील काळसरपणा कमी होण्यास मदत होते.
लिंबू आणि साखरेचे एकत्र मिश्रण करा. नैसर्गिक स्क्रबरच्या मदतीने ओठांना तुम्ही स्वच्छ करू शकता.
बीटाचा रसदेखील ओठांवरील नैसर्गिक गुलाबी रंग टिकून राहण्यास मदत होते.