मधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करते 'ही' पौष्टिक भाजी; औषधी गुणधर्म वाचाच

Healthy Recipe In Marathi: हिवाळ्याच्या ऋतूमध्ये काही भाज्या आवर्जून खाव्यात. यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा नक्की समावेश असावा. आज आम्ही तुम्हाला एका पौष्टिक भाजीबद्दल सांगणार आहोत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 18, 2023, 01:35 PM IST
मधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करते 'ही' पौष्टिक भाजी; औषधी गुणधर्म वाचाच title=
How to Make healthy green Chana Saag recipe in marathi

Healthy Recipe In Marathi: थंडीत उत्तरेकडील लोक जेवणात सरसो का साग, पालक का साग या भाज्या आवर्जुन खातात. थंडीत तापमानात घट होत असताना त्याचा शरीरावरही परिणाम होत असतो. अशावेळी हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास हरभऱ्याच्या हिरव्या पाल्याची व चण्याच्या हिरव्या पाल्याच्या भाजीत अनेक पौष्टिक गुणधर्म आढळतात.

हरभऱ्याच्या व चणाच्या पाल्याच्या भाजीत प्रथिने, फायबर, लोह आणि कॅल्शियम यासारखे घटक आढळतात. त्यामुळं निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांची ही भाजी पूर्तता करते. चण्याच्या हिरव्या भाज्यांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारख्या अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता, मधुमेह यांसारखे शरीराची अनेक आजार कमी होतात. परिपूर्ण अशी ही भाजी थंडीत प्रत्येकाने खावी. 

भाजीचे फायदे

मधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हरभऱ्याच्या हिरव्या पाल्याची भाजी खूप फायदेशीर ठरते. बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाकरी खाल्ली तर आणखी चव वाढते. कारण बाजरी हे सुपरफुड आहे. त्यामुळं अनेक विकार दूर होतात. 

मधुमेहावर नियंत्रण

हरभऱ्याच्या पाल्याच्या भाजीत इन्सुलीनची निर्मिती वाढवण्याची क्षमता असते. त्यामुळं मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ही भाजी महिन्यातून दोनदा तरी सेवन करावी. 

हृदयविकारावर नियंत्रण

हरभऱ्याच्या पाल्याच्या भाजीत अनेक प्रकारचे हेल्दी फॅट्स आणि पोटॅशियम असतं. ते हृदयाच्या संरक्षणासाठी आवश्यक घटक असतात. 

त्वचेसाठी फायदेशीर

नितळ त्वचा मिळवण्यासाठी ही भाजी खूप जास्त फायदेशीर आहे. त्वचेवरील फ्री रॅडिकल कमी करण्यासाठी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी मदत करते. त्यामुळं अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के हे घटक त्वचेचं सौंदर्य वाढवतात.

डोळे

थंडीत हवेतील प्रदूषण खूप वाढते. त्यामुळं थंडीत आवर्जून ही भाजी खा. त्यात असलेले व्हिटॅमिन ई आणि के घटक डोळ्यांच्या स्नायूंचे पोषण करतात. त्यामुळं डोळ्यांचे तेज वाढते. 

कशी करायची ही भाजी

सर्वात पहिले हरभऱ्याचा पाला व्यवस्थीत धुवून घ्या. त्यानंतर भाजी आणि कांदा बारीक चिरुन घ्या. नंतरसर्वप्रथम तेल थोडे गरम करुन त्यात जिरे-मोहरी- मिरची आणि कांद्याची फोडणी द्या. कांदा कोमवून घेतल्यानंतर त्यात अर्धा वाटी मूगडाळ टाका थोडे वाफवून घेतल्यानंतर चिरुन घेतलेली भाजी टाका आणि भाजी पुन्हा वाफवून घ्या. बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खा.