'या' पद्धतीने घरच्या घरी बनवा नैसर्गिक टूथपेस्ट!

पूर्वी दात स्वच्छ करण्यासाठी कडूलिंबाची काठी, दंत मंजन, मीठ वापरले जायचे

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 31, 2018, 05:16 PM IST
'या' पद्धतीने घरच्या घरी बनवा नैसर्गिक टूथपेस्ट! title=

मुंबई : पूर्वी दात स्वच्छ करण्यासाठी कडूलिंबाची काठी, दंत मंजन, मीठ वापरले जायचे. कालांतराने त्याची जागा टूथपेस्टने घेतली. मात्र बाजारात मिळणाऱ्या टूथपेस्टमध्ये कृत्रिम स्वीटर्नर, केमिक्लस असतात. मग आपण जर घरच्या घरि टूथपेस्ट बनवू शकलो तर...? फारच छान होईल. जाणून घेऊया त्याची प्रक्रिया....

साहित्य

  • २-३ कप बेकिंग सोडा
  • १ छोटा चमचा मीठ
  • इसेंशियल ऑईल किंवा मिंटच्या स्वादासाठी तुम्ही पेपरमिंट ऑईल देखील वापरू शकता.- १०-१२ थेंब
  • १-२ कप खोबरेल तेल
  • २ चमचे स्टिविया पावडर (याचा वापर फक्त कडू चव कमी करण्यासाठी केला जातो. ही पावडर झाडांपासून बनत असल्यामुळे आरोग्याची चिंता करू नका.)

कृती

  • डबल बॉयलर किंवा मायक्रोव्हेव मध्ये खोबरेल तेल गरम करा. थंड झाल्यावर त्यात बेकिंग सोडा, स्टिविया पावडर आणि इसेंशियल ऑईल घाला. त्यानंतर त्यात मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा. घट्टसर पेस्ट झाल्यानंतर तुम्ही त्याचा वापर करू शकता.
  • ही पेस्ट हवाबंद ट्यूबमध्ये ठेवू नका आणि पाण्यापासून दूर ठेवा. एका डब्यात ठेवून गरजेवेळी चमच्याने तुम्ही ती वापरू शकता. 
  • अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही टूथपेस्ट घरच्या घरी बनवू शकता. ही पेस्ट जास्त दिवस टिकेलही. पण तुम्हाला फ्रेश पेस्ट हवी असेल तर तुम्ही कमी साहित्य घेऊन कमी प्रमाणात बनवू शकता.