नवी दिल्ली : आरोग्यासाठी भाज्या-फळे फायदेशीर असतात, हे आपण सर्वच जाणतो. आजकाल तर डाएटचे फॅड आहे आणि त्यात सलाड खाणे ट्रेंडमध्ये आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. त्यातील एक भाजी म्हणजे मुळा. अनेकांना त्याचा स्वाद आवडत नसल्याने मुळ्याचे नाव काढताच ते नाकं मुरडतात. पण मुळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? आरोग्यासाठी फायदेशीर असण्याबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यातही मुळा महत्त्वाचे कार्य करतो. दैनंदिन आहारात मुळ्याचा समावेश केल्यास कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार दूर राहण्यास मदत होते.
जाणून घेऊया मुळा खाण्याचे फायदे...