जेवताना पाणी पिण्याची सवय कशी टाळाल

जेवताना अनेकांना सतत पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यापासून वेळीच दूर न झाल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. 

Updated: Feb 8, 2018, 11:45 PM IST
जेवताना पाणी पिण्याची सवय कशी टाळाल

मुंबई : जेवताना अनेकांना सतत पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यापासून वेळीच दूर न झाल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. 

जेवताना पाणी पिणे ही सवय अनेकांना लहानपणापासून असते.  या सवयीपासून लगेजच सुटका मिळणे शक्य नाही. परंतू या काही साध्या-सोप्या टीप्सने तुम्ही यावर मात करू शकता.

जेवणात मीठाचा वापर कमीत कमी करा –

मीठामुळे आपल्याला सतत तहान लागते.  त्यामुळे आहारात आवश्यक तेवढाच मीठाचा वापर करा. अळणी जेवणात वरून मीठ घालू नका.

जेवण चावून खा, गिळू नका – 

‘प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा.’ असे म्हटले जाते. कारण अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मीतीला चालना मिळते व पचनही सुधारते.  तसेच अन्न चावून खाल्ल्याने त्याचे विघटन आणि पचन सुधारते. याबरोबरच अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मिती  वाढते आणि पाणी पिण्याची इच्छा कमी होते.

जेवणाआधी 30 मिनिटे पाणी प्या – 

एक्सपर्ट  सल्ल्यानुसार, वजन घटवण्यासाठी तसेच उत्तम मेटॅबॉलिक रेटसाठी जेवणापूर्वी 30 मिनिटे अगोदर साधे पाणी प्यावे. यामुळे जेवताना  पाणी पिण्याची इच्छा कमी होते.