'या' उपायांनी एका मिनिटांत दूर करा उचकी!

एखाद्या  व्यक्तिने आपली आठवण काढली की आपल्याला उचकी लागते, असा समज आहे. मात्र त्यात तथ्य नाही.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 8, 2018, 10:32 PM IST
'या' उपायांनी एका मिनिटांत दूर करा उचकी!

मुंबई : एखाद्या व्यक्तिने आपली आठवण काढली की आपल्याला उचकी लागते, असा समज आहे. मात्र त्यात तथ्य नाही. छातीच्या पिंजर्‍याचा विभाजक पडदा ( डायफ्रॅम) स्नायूंनी बनलेला असतो.  कधी कधी अचानक या स्नायूंचे आकुंचन होते. ही क्रिया अनैच्छिक असते.  वारंवार आकुंचन झाल्याने, स्वरयंत्रणेतील पट्ट्या जवळ येतात व उचकी निर्माण होते.  उचकी काही काळासाठी ठराविक अंतराने येते व आपोआप बंद होते. मात्र काहींमध्ये उचकी दीर्घकाळ राहते. अशावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणेच हितकारी आहे.

कशी थांबवाल उचकी ? 

  • उचकी थांबवण्यासाठी, अनेक घरगुती उपाय आहेत. मात्र काही काळ श्वास रोखून ठेवणे हा एक उत्तम उपाय आहे. दीर्घ श्वास  घ्या व तो काही काळ रोखून ठेवा. हळूहळू श्वास सोडा. उचकी थांबण्यासाठी असे 2-3  वेळा करा. तुम्ही जेव्हा श्वास रोखून ठेवता तेव्हा फुफ्फुसातील हवा  डायफ्रॅमला खाली ढकलण्याचा प्रयत्न करते व उचकी थांबण्यास मदत होते.
  • उचकी लागल्यावर मान वर करून ७ वेळा पाणी प्या. एकदम न पिता एक-एक घोट असे ७ वेळा प्या. 
  • अगदी सोपा आणि आपल्या सर्वांना माहित असलेला उपाय म्हणजे साखर खा आणि त्यावर पाणी प्या. त्यामुळे उचकी थांबण्यास मदत होईल.