Nose Bleeding Treatment : उन्हाळ्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. यामध्ये नाकातून रक्तस्त्राव देखील होतो. उन्हाळ्यात तापमान वाढले की हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नाकात कोरडेपणा येतो. नाकातील कोरडेपणामुळे शिरा कोरड्या होतात किंवा फुटतात आणि जखमा होतात. त्यामुळे नाकातून रक्तस्त्राव सुरू होतो. कोरडेपणामुळे रक्तस्त्राव समस्या उद्भवू शकतात. ही समस्या 3 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये अधिक आढळते. पण वृद्ध व्यक्तींनाही या समस्येचा त्रास होऊ शकतो. नाकातील ऍलर्जी, अंतर्गत नसा किंवा रक्तवाहिन्यांना इजा होणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, रक्तदाब, अति उष्णता, अति शिंका येणे, थंडी वा झपाट्याने नाक घासणे यामुळेही ही समस्या उद्भवू शकते.
उन्हाळ्यात शरीर शक्य तितके हायड्रेटेड ठेवा. शक्य तितके पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरातून जास्त घाम निघत असल्याने पाण्याची कमतरता भासते. म्हणून, अधिक द्रव वापरा. पाण्याव्यतिरिक्त नारळ पाणी आणि शरबत यांचे सेवन करा. अगदी नारळ पाणी शक्य नसेल तर नारळ पाणी किंवा लिंबू पाणी प्या.
उन्हाळ्यात गरम पदार्थ खाऊ नयेत. गरम पदार्थांचे सेवन केल्याने नाकातील रक्तवाहिन्यांवर दाब पडतो. त्यामुळे नाकातून रक्तस्त्राव सुरू होतो. त्यामुळे गरम मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावेत. जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. तसेच उन्हाळ्यात मांसाहार कमी करा. आहारात हलके आणि थंड पदार्थ खा.
जेव्हा नाकातून रक्तस्त्राव होत असेल तेव्हा थंड किंवा गरम पॅक वापरा. थंड पॅक नाकाच्या वर ठेवावा, तर गरम पॅक नाकाच्या खाली ठेवावा. यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब कमी होतो आणि रक्तस्त्राव थांबतो.
तसेच अनेकजणांना उन्हात बाहेर गेल्यावर थेट सूर्याच्या संपर्कात आल्यावर नाकातून रक्त येण्याची समस्या असते. अशावेळी तुम्ही उन्हात बाहेर जाणे टाळा. अगदी आवश्यक असल्यास सोबत टोपी, थंड पाण्याची बॉटल आणि छत्री घ्या. यामुळे उन्हाचा थेट संपर्क तुमच्याशी येणार नाही.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)