Bird flu symptoms and treatment in Marathi: कोरोना व्हायरस नियंत्रणात येत असताना आता पुन्हा चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. H5N1 म्हणजेच बर्ड फ्लूचा साथीचा आजार पुन्हा पसण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर असल्याचे म्हटले जातं आहे. तसेच बर्ड फ्लू H5N1 च्या संभाव्य धोक्याबद्दल डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. बर्ड फ्लू हा आजार कोरोना महामारीपेक्षा 100 पट जास्त धोकादायक असू शकतो. फ्लूमुळे किमान निम्म्या लोकांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. विषाणूच्या संसर्गाची पातळी वाढल्यास जागतिक साथीच्या आजाराला कारणीभूत ठरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. जर तुम्ही चिकन आणि अंडी खात असाल तर आरोग्यासाठी कितपत सुरक्षित आहे ते जाणून घ्या...
दरम्यान टेक्सामधील एका व्यक्तीला बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली असून बर्ड फ्लू H5N1 या विषाणूची लागण झालेल्या गाईंच्या संपर्कात आल्यानंतर त्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण होते. या विषाणू मानवामध्ये आढळल्यामुळे याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 2003 पासून, H5N1 बर्ड फ्लूची लागण झालेल्या प्रत्येक 100 रुग्णांपैकी 52 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 887 प्रकरणे नोंदवली गेली असून त्यापैकी एकूण 462 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू दर 0.1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. सुरुवातीपासून भागीदार रोगाचे प्रमाण सुमारे 20 टक्के होते.
ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे त्याच ठिकाणी त्याचे नियंत्रण करण्यासाठी कार्यक्षम असणे आवश्यक आहे. परंतु अंडी आणि कुक्कुट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानात 30 मिनिटे शिजवून ते पूर्णपणे निष्क्रिय होतात. म्हणून, अंडी आणि कोंबडीचे मांस खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. बर्ड फ्लू आजाराबाबत शास्त्रीय माहितीवर आधारित गैरसमज आणि अफवांवर विश्वास ठेवू नका.
अंडी पूर्णपणे शिजवलेले असले पाहिजे. जोपर्यंत अंड्यातील पिवळ बलक आणि पांढरा भाग घट्ट असतो आणि योग्य प्रकार शिजवलेला असतो, तोपर्यंत खाल्लास संसर्गाचा धोका कमी असतो. कारण त्यामध्ये उच्च तापमानात शिजवल्यास त्यात असलेले कोणतेही विषाणू नष्ट होतात.
राज्यातील कोणत्याही गावात कावळा, पोपट, बगळे या पक्ष्यांमध्ये मर्तुक झाल्याचे दिसल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त मर्तुक झाल्याचे दिसल्यास तत्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला कळवा. अशावेळी तुम्ही त्या मृत पक्षांना हात लावू नका किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नका. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1962 किंवा 18002330418 किंवा टोल फ्री क्रमांकावर त्वरित फोन करून माहिती द्या.
बर्ड फ्लू सर्वेक्षणासाठी, मुख्यतः घरातील कुक्कुट पक्षी, व्यावसायिकरित्या पाळले जाणारे पक्षी, पक्षी बाजार, स्थलांतरित पक्ष्यांचे मार्ग, स्थलांतरित पक्षी पाणी पिण्यासाठी जमलेले पाणलोट, प्राणी संग्रहालय, जंगले या ठिकाणाहून पक्ष्यांचे नमुने गोळा करुन त्याची तपासणी केली जाते.
हा विषाणू केवळ पक्ष्यांसाठीच नाही तर मानवांसाठीही धोकादायक मानला जातो. ही लक्षणे मानवांमध्ये सामान्य असू शकतात. जसे की, नाक गळणे, डोकेदुखी, गळ्यात सूज, कफ, ताप येणे, उलटी आल्यासारखे वाटणे, वारंवार अतिसार, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात.
जिवंत कोंबडी, पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नका.
मांस शिजवण्यासाठी वापरलेली भांडी वेगळी ठेवा
बर्ड फ्लूच्या संसर्गाच्या काळात मांसाहार टाळा
संक्रमित भागात जाऊ नका किंवा मास्क वापरा
मांसाहार करणे चांगले आहे आणि मांस गरम होईपर्यंत शिजवले जाईल याची खात्री करा.
गरम पाण्याने आणि साबणाने हात धुवा.
कच्चे अंडी खाऊ नका
मटन मार्केट किंवा पोल्ट्री फार्ममध्ये जाऊ नका
अर्धकच्ची अंडी, कोंबड्या किंवा इतर प्राणी खाऊ नका