नवजात बाळांसोबत आईसाठीही 'नवसंजीवनी' ठरतायेत 'या' ह्युमन ब्रेस्ट मिल्क बॅंक

बाळाच्या जन्मानंतर अवघ्या अर्धातासामध्ये बाळाला आईचं दूध पाजणं गरजेचे आहे. 

Dipali Nevarekar | Updated: Aug 2, 2018, 01:37 PM IST
 नवजात बाळांसोबत आईसाठीही 'नवसंजीवनी' ठरतायेत 'या' ह्युमन ब्रेस्ट मिल्क बॅंक title=
Photo courtesy DNA

मुंबई : बाळाच्या जन्मानंतर अवघ्या अर्धातासामध्ये बाळाला आईचं दूध पाजणं गरजेचे आहे. आईचं दूध हे बाळासाठी अमृतासमान मानले जाते. अनेक इन्फेक्शन्सपासून बाळाचं रक्षण करण्यासाठी त्याची वाढ आणि प्रकृती सुधारण्यासाठी आईच दूध मदत करते. 

करियर आणि कुटुंब जीवन सांभाळत आज स्त्रिया बाळाचा विचार करतात अशावेळेस बाळाचं प्लॅनिंग करताना होणारा उशीर, वाढतं वय यामुळे काही स्त्रियांमध्ये समस्या निर्माण होतात. तसेच दूधाची पुरेशी निर्मिती होत नसल्याने बाळाच्या विकासावरही त्याचा परिणाम होतो. स्तनपान करणार्‍या महिलांंच्या आहारात नकोच 'हे' पदार्थ 

स्त्रियांच्या आणि नवजात बाळाच्या या समस्येवर एक उपाय म्हणजे ' ह्युमन ब्रेस्ट मिल्क बॅंक' 

ह्युमन ब्रेस्ट मिल्क बॅंक  

ह्युमन ब्रेस्ट मिल्क बॅंकेमध्ये स्त्रिया दूध दान करू शकतात. यासाठी त्यांची शारीरीक चाचणी करूनच त्यांचं दूध मिल्क बॅंकेमध्ये साठवले जाते. स्त्रियांकडून जमवलेलं हे दूध  -20 डिग्री मध्ये साठवले जाते. हे दूध सहा महिन्यांपर्यंत वापरले जाऊ शकतात. त्यामुळे ज्या नवमातांमध्ये दूध निर्मितीमध्ये समस्या असते त्यांच्या बाळांसाठी ह्युमन मिल्क बॅंक मदत करते. 

कुठे आहेत या ह्युमन मिल्क बॅंकचे

1) सायन हॉस्पिटल ( लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल) 

डॉ. जयश्री मोंडकर (निओनॅटोलॉजिस्ट )
02224076381, 022-24076382

2) केईएम हॉस्पिटल - परेल  
91-22-2410 7000 

3) जेजे हॉस्पिटल 
(91)-22-23735555, 23754995, 23739400, 
 23750102, 23739034, 23739035, 23739040
 
4) कामा हॉस्पिटल - फोर्ट 

02222620390

5)  बा. य. ल. नायर धर्मदाय रूग्णालय, मुंबई सेंट्रल 
 022 2302 7000
 
6) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि अनुसंधान केंद्र,पुणे
020 - 49153380

7) बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल - परेल 
91-2224197200