नवरा-बायकोच्या वयात मोठा फरक असेल, तर 'या' समस्या त्यांच्यासाठी ठरतील डोकेदुखी

विवाहित जोडप्यांच्या वयात मोठा फरक असेल, तर त्यांच्यामध्ये कोणत्या समस्या उद्भवू शकतात याबद्दल जाणून घ्या.

Updated: Mar 29, 2022, 08:08 PM IST
नवरा-बायकोच्या वयात मोठा फरक असेल, तर 'या' समस्या त्यांच्यासाठी ठरतील डोकेदुखी title=

मुंबई : लोकं हे बऱ्याचदा बोलतात की, लग्नासाठी वयाची गरज नाही तर, समंजसपणा आणि अनुकूलता आवश्यक आहे. एकमेकांवर विश्वास आणि प्रेम असलं की, नातं आपोआप टिकतं. हे सगळं बोलताना किंवा ऐकताना सोपं वाटत असलं तरी, तज्ज्ञांच्या आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मात्र लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या वयातील फरक महत्त्वाचा ठरतो आणि वय ही अशी गोष्ट आहे की, जे दोघांचं नातं टिकवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.

त्यामुळे जर पती-पत्नीच्या वयात जास्त फरक असेल, तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पूर्वीच्या वेळी हे सगळं करत होते मात्र आता जग आणि परिस्थीती बदलली आहे.

पती-पत्नीच्या वयातील फरक जास्त असेल, तर त्या जोडप्यांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागते, असे सामान्यतः म्हटले जाते. अशा परिस्थितीत, जर विवाहित जोडप्यांच्या वयात मोठा फरक असेल, तर त्यांच्यामध्ये कोणत्या समस्या उद्भवू शकतात याबद्दल जाणून घ्या.

सोसोयटी नेहमीच जज करते

बॉलीवूडमध्येही अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्या वयात खूप फरक आहे आणि त्यामुळे अनेकदा लोकं त्यांना जज करु लागतात किंवा त्यांच्याबद्दल बोलू लागतात. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांनाही जीवनात या समस्येचा सामना करावा लागतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, एखाद्या जोडप्याच्या वयात मोठा फरक असेल तर समाजात अनेकदा त्यांना टिकेला सामोरं जावं लागतं आणि यामुळे त्या कपलच्या मानसिकतेवर देखील परिणाम होतो.

जोडीदाराला दोष देणे

लग्नानंतर वयात जास्त फरक असलेल्या जोडप्यांची ही सर्वात सामान्य समस्या आहे. लग्नानंतर आजूबाजूचे लोक अनेक प्रकारे टीका करतात आणि अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थितीत असे होऊ शकते की, तुमच्या दोघांमध्ये मतभेद होऊ शकतात किंवा भांडण होऊ शकते आणि मग तुम्ही दोघेही एकमेकांना दोष देऊ शकता. अशा परिस्थितीत, आपण अनेक प्रकरणांमध्ये जोडीदाराला दोष देऊ शकता, जी वयाच्या फरकाने उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे.

विचार आणि मानसिकता वेगळी असेल

जर पती-पत्नी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वाढले असतील, तर दोघांची विचारसरणी आणि समज वेगळी असेल हे उघड आहे. याचे कारण दोघांची विचारसरणी वेगळी असेल आणि त्यात वयातील फरक ही गोष्ट आणखी गंभीर करेल. अशा स्थितीत कोणत्याही मुद्द्यावर दोघांचे मत वेगळे असेल तर त्यातून वाद किंवा भांडण होऊ शकते.

मुले होण्याचा निर्णय घेण्यास असमर्थता

वयात मोठा फरक असलेल्या जोडप्यांना मुले होण्याची समस्या भेडसावू शकते. कदाचित जोडप्यांपैकी एकाला मूल हवे असेल, तर दुसऱ्याला नाही. वाढत्या वयामुळे, असे होऊ शकते की मोठ्या जोडीदाराची मुले होण्याची वेळ निघून जात आहे, कारण वयामुळे त्याची प्रजनन क्षमता कमी होते. आता अशा परिस्थितीत जर समोरचा त्यासाठी तयार नसेल, तर अशा परिस्थितीत समस्या उद्भवू शकतात.

सेक्स जीवनातील समस्या

जेव्हा लैंगिक सुसंगततेचा विचार केला जातो तेव्हा देखील वयाच्या मोठ्या अंतरामुळे सेक्स संबंधीत अनेक समस्येचा सामना केला जाऊ शकतो. याचे कारण म्हणजे वयाने मोठा असलेल्या जोडीदाराला कालांतराने लैंगिक इच्छा कमी होते. ज्यामुळे तरुण जोडीदाराला त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत शारीरिक समाधान न मिळाल्याने नात्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.