'या' व्यक्तींना डेल्टा व्हेरिएंटविरोधात लसीचा एक डोसंही पुरेसा- ICMR

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट संपू्र्ण जगासाठी धोकादायक बनला आहे.

Updated: Jul 4, 2021, 07:21 AM IST
'या' व्यक्तींना डेल्टा व्हेरिएंटविरोधात लसीचा एक डोसंही पुरेसा- ICMR  title=

मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट संपू्र्ण जगासाठी धोकादायक बनला आहे. अशातच आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआरच्या अभ्यासातून एक मोठी गोष्ट समोर आली आहे. या अभ्यासाच्या माध्यमातून जे कोरोनातून बरे झालेत आणि लसीचे एक किंवा दोन डोस घेतले आहेत ते कोविशिल़्ड लसीचा एक किंवा दोन डोस घेणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक सुरक्षित आहेत.

आयसीएमआरच्या अभ्यासातून असं लक्षात आलं आहे की, हुमोरल आणि सेल्युलर इम्युन कोरोना वायरसच्या डेल्टा व्हेरिएंट विरोधात महत्त्वपूर्ण आहे. जो इतर म्यूटेडेट स्ट्रेंसच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहे.

अहवालांनुसार, अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असं लक्षात येतंय की, कोरोनातून बरं झालेल्या लोकांनी जर लसीचे एक किंवा दोन घेतले असतील तर ते कोव्हिशिल्डच्या एक किंवा दोन डोस घेतलेल्या इतर लोकांच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटच्या विरोधात अधिक सुरक्षित आहेत. 

आयसीएमआरने भारतात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, भारतात जर कोरोनाची तिसरी लाट आली तर ती दुसऱ्या लाटेइतकी गंभीर नसेल. लसीकरण मोहीम भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या इतर लाटांवर मोलाची भूमिका बजावते. पहिल्यांदा ज्या देशात कोरोनाचा व्हेरिएंट सापडत होता त्याला त्या नावाने ओळखलं जायचं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने यांना नवीन नावं दिली. त्यानंतर आता कोरोनाचे व्हेरिएंट डेल्टा, कप्पा, अल्फा, बीटा आणि गामा असे ओळखले जातात.

आयसीएमआरच्या निष्कर्षानुसार व्हायरसपासून बरे झालेल्या एखाद्या व्यक्तीचा लसीचा एक डोसदेखील कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी पुरेसा आहे. त्याचप्रमाणे नव्याने येणाऱ्या व्हेरिएंटपासून संरक्षण करतो.