शरीरातील ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवा

शरीरातील ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवता येतात, त्यामुळे या प्लेटलेट्स कमी झाल्या असतील तर चिंता करण्याचं कारण नाही.

Updated: Sep 1, 2017, 10:55 AM IST
शरीरातील ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवा title=

मुंबई : शरीरातील ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवता येतात, त्यामुळे या प्लेटलेट्स कमी झाल्या असतील तर चिंता करण्याचं कारण नाही. निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट १५० हजार ते ४५०  हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट १५० हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते.

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते.   काही प्रकारच्या आजारात उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.
यात काही औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन केल्यानेही प्लेटलेटसंच प्रमाण कमी होतं.

गुळवेल

गुळवेलचा ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. पण प्रथम हा गुळवेलच आहे का ते ओळखा तेव्हाच त्याचा ज्यूस बनवून पिण्याचा विचार करा. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी करण्यास हरकत नाही, तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

२ चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी, आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध असते.

बी

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सिडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काही दिवसात वाढवतं. २ ते ३  चमचे बीट रस १ ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढण्यास मदत होते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ज्या रूग्णांच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी होतं, अशा रूग्णांना देखील बीट खाण्याचा सल्ला दिला जातो.

पालक

व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत आहे. अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. २ कप पाण्यामध्ये ४ ते ५ पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून २ ते ३ वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे 

पपई

२००९ मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते. पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 

नारळ पाणी

नारळ पाणी सहज उपलब्घ होतं, शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

आवळा

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी ३ ते ४ आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

भोपळा

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन 'A' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.