सावधान! लहान मुलांना सांभाळा, 'या' शहरात मुलांना न्यूमोनियाची लागण

Pneumonia in Children  : हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मात्र यात जंतूसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 26, 2024, 03:35 PM IST
सावधान! लहान मुलांना सांभाळा, 'या' शहरात मुलांना न्यूमोनियाची लागण title=

Pneumonia in Children Pune Marathi : थंडीच्या हंगामात लहान-मोठे सर्वांनाच सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्या होतात. सध्या तापमानातही कमालीचे खाली घसरले आहे. हिवाळ्यात खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास ती हवा फुफ्फुसांमध्ये जाऊन लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचा धोका वाढतो. न्यूमोनिया श्वासासंदर्भातील एक समस्या आहे. हा आजार बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे होतो. याचदरम्यान पुण्यातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

पुण्यासह राज्यात मुलांमध्ये न्यूमोनियाचं प्रमाण वाढले आहे. पुण्यातील प्रत्येक रुग्णालयांत न्यूमोनियाचे 5 ते 6 रुग्ण दाखल आहेत. हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. यात जंतूसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. मात्र, यंदा आजारी मुलांमध्ये विविध विषाणूंबरोबरच जंतूसंसर्ग अधिक वाढला आहे. तसेच, न्यूमोनिया संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.. 

लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला, कफ यांसारखी लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आवाहन बालरोगतज्ज्ञ स्मिता सागडे यांनी केलं. साधारणपणे फेब्रुवारीत हवामान कोरडे असते. त्यामुळे लहान मुले आजारी पडण्याची प्रमाण किरकोळ असते. तसेच आजारी मुले दोन ते तीन दिवसांत बरे होतात. मात्र, यंदा ऋतू बदलाचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर अधिक जाणवत आहे. ओपीडीमध्ये लहान मुलांची संख्या वाढली असली, तरी त्यामध्ये न्यूमोनियाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येते.

पाच वर्षापुढील मुलांना जास्त धोका

हवामान बदलात वय वर्षे पाच वर्षांपर्यंतची मुले आजारी पडतात. मात्र, काही मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून येत आहे. प्रसंगी काही जणांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. या मुलांची ऑक्सिजन पातळी कमी होत आहे. आज प्रत्येक रूग्णालयात 5 ते 6 रुग्ण न्यूमोनियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे मुलांशी विशेष काळजी घ्यावी असे देखील आव्हान डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. आजारी मुलांच्या तपासणीमध्ये बहुतांश मुलांमध्ये विषाणू संसर्गाबरोबर जंतूसंसर्ग होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे न्यूमोनियाची लक्षणे असलेल्या मुलांचे प्रमाण वाढलेले अहे. न्यूमोकोकल लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये ही लक्षणे आढळून येत असल्याने, ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याने मुलांना रूग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे लसीकरण करून घ्यावे.

न्यूमोनिया म्हणजे काय?

न्यूमोनिया हा श्वसनमार्गाचा आजार आहे. विषाणू, जीवाणू किंवा बुरशी संसर्गामुळे फुफ्फुसांमध्ये संसर्ग होतो. न्यूमोनियाचा संसर्ग सौम्य किंवा काही प्रकरणांमध्ये जीवघेणा ठरतो. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसातील पेशींना सूज यते. फुफ्फुसात हवेच्या अत्यंत छोट्या-छोट्या पिशव्याअसतात. यांना अल्वेओली म्हणतात. यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे न्यूमोनिया होतो.

न्यूमोनियाची लक्षणे

– श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे
– जोरजोरात आणि कमी श्वास घेणे
– हृदयाच्या ठोक्यांचे प्रमाण वाढणे
– ताप अंगात थंडी भरणे आणि खूप घाम येणे
– कफ, छातीत दुखणे, नॉशिया, उलट्या होणे किंवा डायरिया