केस गळतीच्या औषधामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, संशोधनात दावा

Health Tips : हल्ली केस गळतीचा त्रास स्त्रीपासून अगदी पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येते. केस गळती थांबवण्यासाठी अनेक औषध घेत असतो. पण एका संशोधनानुसार केळ गळतीचे औषध ह्रदयविकाराचा धोका कमी करु शकतो, असा दावा करण्यात आला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 26, 2024, 02:38 PM IST
केस गळतीच्या औषधामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, संशोधनात दावा  title=

Health Tips News In Marathi : कामाचा ताण,  वातावरणातील धूळ आणि केसांची नीट काळजी घेणे इत्यांदीमुळे सध्या स्त्री पुरुषांना केस गळतीची समस्या उद्भवते. केस गळतीमुळे केस खूपच विरळ होतात तसचे अनेकदा त्या ठिकाणी टक्कल देखील पडते. लांब सडक आणि दाट केस स्त्रीयांचा आत्वविश्वास वाढवतात. तेव्हा असे केस सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. केस गळती नको म्हणून आपण अनेक घरगुती उपाय किंवा औषधांचा वापर करतो. यापैकीच एक औषध ह्रदयविकाराचा धोका कमी करु शकतो असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

चुकीची जीवनशैली यामुळे ह्रदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. ह्रदयविकाराच्या रुग्णांसाठी संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक ठरते.  हृदयविकार हा जगातील सर्वात घातक आजारांपैकी एक मानला जातो, ज्यामुळे दरवर्षी सर्वाधिक मृत्यू होतात. हृदयविकाराशी संबंधित मृत्यूची काही सामान्य कारणे म्हणजे स्ट्रोक, हृदयविकार यासोबतच आजच्या काळात आणखी एक समस्या सामान्य झाली आहे ती म्हणजे केस गळणे आणि टक्कल पडणे. एका अभ्यासानुसार, केसगळतीवरचे असं एक औषध आहे जे केवळ केस गळतीच थांबवत नाहीतर हृदयाच्या आरोग्यासाठी आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते, असा दावा करण्यात आला आहे. एका संशोधनात असे दिसून आले आहे की केस गळण्याचे औषध 'फिनास्टराइड' हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. 

अमेरिकेतील इलिनॉय युनिव्हर्सिटी ऑफ अर्बाना-चॅम्पेनच्या अभ्यासानुसार, फिनास्टेराइड या औषधामुळे कोलेस्टेरॉल कमी करू शकते आणि हृदयरोगाचा धोका ही कमी करण्यास मदत करते. जर्नल ऑफ लिपिड रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, एका टीमने 2009 ते 2016 दरम्यान आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पुरुषांचा डेटा पाहिला. या संशोधनादरम्यान असे आढळून आले की, फिनास्टराइडचा वापर आणि कमी कोलेस्ट्रॉल पातळी यांच्यात संबंध आहे. हे देखील आढळून आले की औषध न घेतलेल्या पुरुषांच्या तुलनेत, औषध घेत असलेल्यांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी सरासरी 30 गुणांनी कमी होती.

तसेच या सर्वेक्षणासाठी योग्य 4800 उत्तरदात्यांपैकी केवळ 155 होते आणि ते सर्व 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे पुरुष होते. सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या पुरुषांनी किती प्रमाणात किंवा किती काळ औषध घेतले हे देखील संशोधकांना सांगता आले नाही. एथेरोस्क्लेरोसिससाठी अनुवांशिकदृष्ट्या संवेदनाक्षम असलेल्या नर उंदरांमध्ये फिनास्टराइडच्या चार स्तरांची चाचणी घेण्यात आली. उंदीरांना 12 आठवडे जास्त चरबीयुक्त आणि उच्च कोलेस्ट्रॉल पाश्चात्य आहार दिला गेला. ज्या उंदरांना फिनास्टराइडचा उच्च डोस देण्यात आला त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी असल्याचे दिसून आले. यकृतामध्ये देखील तुलनेने कमी दाहक मार्कर आणि कमी लिपिड होते. यामुळे मानवांच्या बाबतीतही सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. केस गळतीच्या समस्यांसाठीही फिनास्टराइड हे औषध घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.