न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने इरफान खानचं निधन; जाणून घ्या काय आहे हा आजार?

काय आहे न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर?

Updated: Apr 30, 2020, 07:59 PM IST
न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने इरफान खानचं निधन; जाणून घ्या काय आहे हा आजार? title=
संग्रहित फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं बुधवारी निधन झालं. 2018 पासून इरफान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरशी झुंज देत होता. इरफान या ट्युमरवर परदेशात जाऊन इलाज घेऊन आला होता. पण त्याची कॅन्सरशी ही झुंज अयशस्वी ठरली. इरफानने त्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरचं (Neuroendocrine Tumor) निदान झाल्यानंतर याबाबत सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. मेडिकल सायन्समध्ये हा ट्युमर धोकादायक असल्याचं सांगितलं जातं. नक्की काय आणि किती धोकादायक आहे Neuroendocrine Tumor?

काय आहे न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर?

न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर (Neuroendocrine Tumor) अतिशय दुर्मिळ असल्याचं सांगितलं जातं. हा शरीरातील कोणत्याही भागात होऊ शकतो. न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हार्मोन्स बनविणार्‍या ग्रंथींशी संबंधित कर्करोग आहेत. बहुतेक न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर फुफ्फुस, अपेन्डिस, लहान आतडं, गुदाशय आणि स्वादुपिंडात होऊ शकतात. पण हे विनाकॅन्सरचेही असू शकतात किंवा ते घातकही ठरु शकतात.

काय आहेत लक्षणं?

न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरमध्ये काही खास लक्षणं दिसतात. उच्च रक्तदाबाच्या समस्येसोबत एन्ग्जायटी अटॅक, ताप, डोकेदुखी, अधिक घाम येणं, मळमळ, उलटी, हृदयाचे ठोके अनियंत्रितपणे धडकणं यांसारखी लक्षण दिसतात. त्याशिवाय काही रुग्णांमध्ये पोटदुखी, कावीळ, गॅस्ट्रिक, अल्सर, आतड्यांसंबंधी अस्वस्थता, वजन कमी होणं अशी लक्षणंही दिसू शकतात.

काय आहे इलाज -

न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर अतिशय दुर्मिळ आहे. वेळीच याबाबत निदान झाल्यास यावर उपचार करणं शक्य आहे. डॉक्टर या आजाराचा इलाज शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरेपी किंवा कीमियोथेरेपीच्या मदतीने करतात. न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर इतर ट्युमरच्या तुलनेत अतिशय हळू-हळू विकसित होतो. जो शरीरात एमिनो एसिड बनवण्याचं काम करतो. हेच कारण आहे की न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरची लक्षणं रुग्णाच्या शरीरात दिसून येतात.

ट्यूमर शरीरात असलेल्या सेल्सचा भाग असतो. हा नियंत्रणाबाहेर जात वाढत-वाढत मासांच्या रुपात जमा होत जातो. जर या ट्यूमरबाबत सुरुवातीलाच, लवकर निदान झालं तर तो नियंत्रणात येऊ शकतो. पण जर वेळीच निदान नाही झालं तर, तो शरीरात वेगाने वाढत जाऊन शरीरातील दुसऱ्या भागातही पसरण्याचा धोका असतो. विषेश बाब म्हणजे की याबाबत वेळीच निदान होत नसल्यानेच हा कॅन्सरचं रुप घेतो. 

 

ल्यूकेमियामुळे ऋषी कपूर यांचं निधन, जाणून घ्या काय आहे हा आजार?