मुंबई : झटपट नाश्त्याला अंड फारच मदत करते. अनेक टेस्टी पदार्थ अंड्यापासून बनवले जाऊ शकतात, त्यामुळे अनेकांच्या दिवसांची सुरूवात नाश्त्याला अंड्यांच्या पदार्थांपासून केला जातो. मात्र पांढर्या अंड्यापेक्षा तपकिरी किंवा गावठी अंडी खाणं हा अधिक आरोग्यदायी असल्याचे समजले जाते. अंड्याच्या रंगामध्ये बदल झाल्याने त्याची पौष्टिकतादेखील बदलते का? याबाबत तुमच्या मनातील प्रश्नाला आरोग्यतज्ञांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
ब्राऊन किंवा गावठी अंडी ही कोंबड्यांना कोणतीही इंजेक्शन्स किंवा औषधं देऊन मिळवत नाहीत. या अंड्यांची पैदास नैसर्गिकरित्या होते. पोल्ट्री ब्रेड हेन्स (कोंबड्यांना ) औषध देऊन त्यांच्यांमध्ये हार्मोनल बदल केले जातात. यामुळे अंड देण्याची क्षमता वाढवली जाते. या तुलनेमध्ये पांढर्या अंड्यापेक्षा गावठी अंडी अधिक पोषक ठरतात. तसेच त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे केमिकल्स नसल्याने त्यामधून शरीराला आवश्यक घटकांचा पुरावठा योग्य प्रमाणात होतो. मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या अंड्यांच्या पोषकतेबाबत खात्री देता येऊ शकत नाही.
गावठी अंड आणि पांढरं अंड यामध्ये आर्टिफिशिएल आणि केमिकल्सचा साठा असल्याने पोषकतेमध्ये फरक आढळू शकतो. हा फरक सुमारे 10-15% असतो. म्हणूनच गावठी अंडी अधिक पोषक ठरतात.
पांढर्या अंड्यांमध्ये आर्टिफिशिएल हार्मोन्स असल्याने मानवी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो अशी भीती लोकांच्या मनात डोकावू शकते. कोंबड्यांना इंजेक्शन दिल्याने पोषकता कमी झाली तरीही त्याचा थेट मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता कमी असते. मात्र कालांतराने अशी अंडी खाल्ल्याने हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण झाल्यास काही आजार होऊ शकतात.