कोणत्या ब्लड ग्रुपला कोरोनाचा अधिक धोका?

चीनमध्ये 2173 लोकांवर हे रिसर्च करण्यात आलं आहे.  

Updated: Mar 19, 2020, 02:00 PM IST
कोणत्या ब्लड ग्रुपला कोरोनाचा अधिक धोका? title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरने जगभारात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 7 हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असेलल्यांना कोरोना व्हायरसचा अधिक धोका आहे. वृद्ध, लहान मुलं यांची सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना व्हायरस ब्लड ग्रुपनुसार हल्ला करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनमधील क्लिनिकल रिसर्चकडून हा दावा करण्यात आला आहे. चीनकडून करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, ब्लड ग्रुप A असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर O ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना कमी धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

चीनमध्ये 2173 लोकांवर हे रिसर्च करण्यात आलं आहे. चीनमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारचा अभ्यास करण्यात आला आहे. हा अभ्यास चीनमधल्या वुआन शहरातील रनमिन, जिनिंतान आणि शेनजेन रुग्णालयात करण्यात आला आहे. चीनमधल्या रिसर्च मॅगझिन MedRxiv मध्ये हे अध्ययन छापण्यात आलं आहे. तर चीनमधील ग्लोबल टाईम्स या प्रसिद्ध वृत्तपत्रात हा अभ्यास छापण्यात आला आहे.

वुआनमधील सेंट मायकल रुग्णालयातील डॉ. प्रदीप चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लड ग्रुपचा अभ्यास केला गेला असून, A ब्लड ग्रुप असणारे लोक अधिक संशयित असल्याचं आढळून आलं असल्याचं ते म्हणाले. 

अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, रक्तगट B आणि AB वर कोरोनाचा कोणताही खास परिणाम दिसूनआला नाही. परंतु, ब्लडग्रुप O असणाऱ्या व्यक्तींना कोरोना धोका कमी असल्याचं दिसून आलं.

चीनने जरी असा दावा केला असला, तरी NDMC चे आयुर्वेदिक रुग्णालयातील माजी चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. डीएम त्रिपाठी यांनी सांगितलं की, कोरोनाचा ब्लड ग्रुपशी संबंध नाही. कोरोना व्हायरसचा संबंध ब्लड ग्रुपशी नसून, प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीनुसार होत असल्याचं ते म्हणाले. अधिक वय असणाऱ्या वृद्धांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशांना करोनाचा अधिक धोका असल्याचं त्यांनी सांगितलं.