हिवाळ्यात डायकॉन मुळा खाणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

Daikon radish : डायकॉन मुळा मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे अनेक पोषक घटक असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. तसेच मुळा ही अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते.

Updated: Nov 5, 2022, 10:05 AM IST
हिवाळ्यात डायकॉन मुळा खाणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे title=

Health Benefits of Daikon Radish : हिवाळ्याचा (Winter Season) हंगाम सुरू होणार असून या मोसमात तुम्हाला बाजारात अनेक भाज्या (vegetables) मिळतील. हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचेही अनेक फायदे आहेत. पण हिरव्या भाज्यांशिवाय आणखी काही भाज्या आहेत ज्यांचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला मुळ्याची भाजी तर माहितच असेल पण डायकॉन मुळा (Daikon Radish) भाजी तुम्हाला माहितेय का?  मुळा खायला काही लोकांना आवडत नाही. पण मुळ्यापासून तयार केले भजी, पराठे किंवा भाजी खायला अनेकांना आवडतात. हिवाळ्यात मुळा खाणे खूप फायदेशीर ठरते. मुळा ही अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते. चला तर मग आज आपण मुळा खाण्याचे आश्चर्यकारक फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत…

डायकॉन मुळा (Daikon Radish) प्रामुख्याने आशियाई आणि भारतीय पाककृतींमध्ये स्वयंपाक करण्यासाठी वापरला जातो. डायकॉनची लागवड त्याच्या बियांसाठी देखील केली जाते. ज्याचे तेल कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये वापरले जाते. डायकॉन ही खूप कमी उष्मांक असलेली भाजी आहे. तरीही त्यात अनेक पोषक घटक आढळतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियमसह अनेक पोषक तत्वांचा हा चांगला स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. हे औषधी गुणधर्मामुळे खूप खास मानले जाते. पोषक तत्वांनी युक्त डायकॉन खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.  

वाचा : रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा सविस्तर  

वजन कमी करण्यास उपयुक्त 

डायकॉनचे (Daikon Radish) सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हे कमी कॅलरी (calories), उच्च फायबरमध्ये (High fiber) समृद्ध आहे जे पचन मंद करू शकते आणि भूक कमी करू शकते, जे वजन कमी करण्यास मदत करू शकते.

आरोग्य सुधारते

डायकॉनमध्ये (Daikon Radish) अनेक वनस्पती संयुगे असतात जे तुमचे आरोग्य सुधारू शकतात आणि काही रोगांचा धोका कमी करू शकतात. डायकॉनच्या अर्कांमध्ये पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंट्स फेरुलिक अॅसिड आणि क्वेर्सेटिन असतात ज्यात दाहक-विरोधी, कॅन्सर आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते.

गंभीर रोगांचे प्रतिबंध

डायकॉन ही एक पौष्टिक आणि स्वादिष्ट भाजी आहे जी अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे जी आपल्या शरीराला जुनाट आजारांपासून वाचवते. याचे सेवन केल्याने हृदयविकार, काही कर्करोग, मधुमेह आणि इतर अनेक आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय डायकॉनचे सेवन केल्याने तुम्ही दीर्घ, निरोगी आयुष्य जगू शकता.