सकाळच्या नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश ठरेल फायदेशीर

सकाळी घराबाहेर पडताना योग्य असा नाश्ता केला तर एनर्जी मिळण्यास मदत होते.

Updated: Jun 11, 2021, 08:58 PM IST
सकाळच्या नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश ठरेल फायदेशीर title=

मुंबई : बऱ्याचवेळा आपण सकाळी ऑफीसला जाण्याच्या घाईत असतो. आणि या घाई-घाईत आपण हमखास सकाळचा नाश्ता करायला विसरतो. मात्र असं करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. जर तुम्ही सकाळी घराबाहेर पडताना योग्य असा नाश्ता केला तर तुम्हाला एनर्जी मिळेल याशिवाय तुमची भूक देखील भागेल. सकाळच्या वेळेस भूक पूर्ण झालेली असली की तुम्ही दिवसभर फ्रेश राहू शकता.

यासाठी सकाळच्या नाश्त्याच्या वेळी कार्बोहायड्रेट्स आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश कारावा. जसं की,

ओटमील

ओटमील हे धान्यांपासून तयार केलेलं असतं. त्यामुळे याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहता येतं. महत्त्वाचं म्हणजे याच्या सेवनाने उच्च रक्तदाब आणि टाईप 2 मधुमेह यांच्यापासून संरक्षण होतं.

अंड

सकाळच्या नाश्त्याच्या वेळी तुम्ही अंड्याचा देखील विचार करू शकता. मात्र अंड्याचा फक्त पांढरा भाग खाणं फायदेशीर ठरेल. यामधून प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी सारखे महत्त्वाचे घटक शरीराला मिळतात.

कलिंगड

सकाळी कलिंगड खाल्ल्य़ाने दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते. शिवाय लाल रंगाची फळं आणि भाज्यांमध्ये लायकोपीन हा घटक असतो. या घटक कर्करोगाला प्रतिबंध करण्यास उपयुक्त ठरतं.

अळशी

अळशीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अॅन्टीऑक्सिडंट असतं. जे शारीरिक आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरतं. शिवाय अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड देखील असतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

कॉफी

एका संशोधनानुसार, कॉफीच्या सेवनामुळे डायबेटीज आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. त्यामुळे सकाळच्य़ा नाश्त्या दरम्यान कॉफीचं सेवनं करणं फायदेशीर ठरेल.

चहा

काहींना कॉफी आवडत नाही. अशा व्यक्तींनी सकाळच्या नाश्त्याला चहाचं सेवन करावं. चहामध्ये कॅटेचीन नावाचा घटक असतो. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही सकाळच्या वेळी कोणत्याही प्रकारचा चहा जसं की, ग्रीन टी, ब्लॅक टी, साधा चहा यांचं सेवन करू शकता.