नवी दिल्ली : टी.व्ही. बघण्याची सवय अनेकांना असते. तासंतास टी.व्ही. पाहण्यापेक्षा नेटफ्लिक्स सारख्या वेबसाईटवर शो पाहणे तरूणांसाठी अधिक फायदेशीर ठरेल.
टी.व्ही. वरील जाहिरातींचा तरुणांच्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो, असे संशोधनाकांनी केलेल्या एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे. अभ्यासानुसार एका वर्षात टी.व्ही. कमी बघणाऱ्यांच्या तुलनेत टी.व्ही. बघणारे युवक ५०० हुन अधिक चिप्स, बिस्किट आणि थंड पेयांसारख्या पदार्थांचे सेवन करतात.
कॅन्सर रिसर्च युके यांनी ११ ते १९ वर्ष वयोगटातील ३,३४८ तरूणांना टी.व्ही. आणि खाण्याच्या अनहेल्दी सवयीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यात असे दिसून आले. टी.व्ही. वर एखादा शो किंवा मालिका बघत असताना जाहिराती देखील बघणारी मुले या अनहेल्दी पदार्थांचे अधिक सेवन करतात.
कॅन्सर रिसर्च युके च्या जोत्स्ना वोहरा यांनी सांगितले की, ''टी.व्ही. बघणारी तरूणाई अति प्रमाणात जंक फूड खातात, असा आम्ही दावा करत नाही. पण जाहिराती आणि खाण्याचा सवयी याचा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध आहे. असे, अभ्यासातून दिसून आले आहे. त्यांनी सांगितले की, आमच्या अभ्यासानुसार जंक फूड आणि टी.व्ही.वरील जाहिराती यांचे कमी प्रमाण यामुळे स्थुलतेच्या समस्येशी लढण्यास मदत होईल.''