'देशी टॉनिक' गुळ; जाणून घ्या गुणकारी फायदे

थंडीच्या दिवसांत गुळ अधिक गुणकारी मानला जातो.

Updated: Nov 6, 2019, 08:54 PM IST
'देशी टॉनिक' गुळ; जाणून घ्या गुणकारी फायदे  title=
संग्रहित फोटो

मुंबई : गुळाला (Jagery) 'देसी चीज' असं मानलं जातं. अनेकांना गुळाच्या फायद्यांबाबत तितकीश माहिती नसते. थंडीच्या दिवसांत तर गुळ अधिक गुणकारी मानला जातो. याच्या सेवनाने शरीर उबदार होण्यास, जेवण लवकर पचण्यास, शरीराला आर्यन मिळण्यास मदत होते. 

- घसा खवखवत असल्यास गुळ अतिशय फायदेशीर आहे. गुळ आणि आलं एकत्र गरम करुन खाल्ल्याने फरक पडू शकतो. 

- थंडीच्या दिवसांत सांधेदुखीच्या त्रासाची शक्यता अधिक असते. अशा वेळी गुळ या दुखण्यातून काही प्रमाणात आराम देऊ शकतो. आलं आणि गुळ, किंवा हे मिश्रण एकत्र दुधासोबतही घेता येऊ शकतं. संधीवात असणाऱ्या रुग्णांनी थंडीच्या दिवसांत रोज गुळ खाणं फायदेशीर ठरु शकतं. 

- जेवणानंतर एक छोटा तुकडा गुळ खाल्ल्याने पचनासंबंधी समस्या कमी होण्यास मदत होते. गुळाच्या सेवनाने पोटात गॅस होण्याची समस्याही कमी होते. 

- मासिक पाळीच्या वेळी महिलांना अनेकदा त्रास होतो. यावेळी होणारा त्रास आणि चिडचिडेपणा गुळ कमी करु शकतो. मासिक पाळीवेळी दिवसांतून ३ ते ४ वेळा गुळ खाऊ शकता.

- ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठीही गुळ खाणं फायद्याचं आहे. गुळात सोडियम आणि पोटॅशियम असतं. हे शरीरात अॅसिडचं प्रमाण कंट्रोल करण्यास मदत करतं. त्यामुळे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहू शकतं. 

  

- गुळ लिव्हरही स्वस्थ ठेवण्यास मदत करतो. गुळ शरीरातील हानिकारक टॉक्सिन बाहेर काढण्यास, शरीरातील रक्तप्रवाह सुरळित करण्यास मदत करतो. लिव्हरसंबंधी काही समस्या असल्यास गुळ रोज खाणं फायद्याचं आहे.

- शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास गुळ खाऊन ती दूर केली जाऊ शकते. आर्यनच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढवलं जाऊ शकतं. गुळला आर्यनचा उत्तम स्त्रोत मानला जातो.