Shampoo नं केस धुताना 'या' चूका टाळा, नाहीतर...

शॅम्पूनं केस धुताना नेमकी काय काळजी घ्यावी? 

Updated: Sep 30, 2022, 11:15 AM IST
Shampoo नं केस धुताना 'या' चूका टाळा, नाहीतर...  title=
know the right way to use shampoo while washing hairs

Common Shampoo Uses Mistakes: आपल्यापैकी अनेकजण केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करतात. असं केल्यामुळं केसामध्ये असणारे सूक्ष्म धुलीकण, धूळ या साऱ्यासोबतच केसांमध्ये आलेला चिकटपणा यापासून सुटका मिळते. केसांतील दुर्गंधी नाहीशी होते. पण, सर्वांनाच हे शॅम्पू रुचतात असं नाही. म्हणजे, काहींना शॅम्पूनंतर केसगळती, राठ केस अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही केस व्यवस्थित धुताय ना, काही चुका तर होत नाहीयेत ना? याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. (know the right way to use shampoo while washing hairs )

शॅम्पूनं केस धुताना नेमकी काय काळजी घ्यावी? (Hair wash tips)

प्रमाणाहून जास्त (Shampoo Quanity) शॅम्पू वापरु नका - सहसा शॅम्पूनं केस धत असताना त्यापासून बराच फेस तयार करुन तो केसांवर लावला जातो. पम, काही मंडळी मात्र फेस तयार न करता तो थेट केसांवर लावतात आणि अपेक्षेहून जास्त शॅम्पू खर्च करतात. ही चांगली सवय नाही. 

चुकीचा शॅम्पू वापरणं- तुमच्या केसांना कोणता शॅम्पू चालतो, हे लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं. अन्यचा चुकीचा शॅम्पू केसांना नुकसान पोहोचवत राहील. डोक्यावरील त्वचा रुक्ष आहे की तेलकट यावरून शॅम्पू ठरवावा. (Hair care) 

अधिक वाचा : Hair Fall In Men: ...तर तुमचीही केस गळती थांबू शकेल, फक्त या गोष्टी पाळा

गरम पाण्याचा वापर टाळा - शॅम्पूनं केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर नुकसान पोहोचवू शकतो. कारण असं केल्यास हेयर क्यूटिकल्सना इजा पोहोचते आणि केसगळतीची समस्या भेडसावते आणि टक्कल पडण्याची भीती सतावते. केस थंड किंवा कोमट पाण्यानं धुवावेत. 

शॅम्पू केसांना व्यवस्थित लावा- अनेकदा काहीजण शॅम्पू केसांना लावून तो जोरजोरात चोळतात. पण, असं करणं म्हणजे निव्वळ वेडेपणा. कारण, यामुळे केसांचं मोठ्या प्रमाणात नुसकान होतं. केसांना शॅम्पू कायम हलक्या हातानं लावा.