कोल्हापूरच्या या पठ्ठ्यानं तब्बल 112 किलो वजन केलं कमी, पाहा काय आहे सीक्रेट

वजन कमी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. पण त्यात सातत्य असलं तरच यश मिळतं.

Updated: Oct 24, 2022, 10:49 PM IST
कोल्हापूरच्या या पठ्ठ्यानं तब्बल 112 किलो वजन केलं कमी, पाहा काय आहे सीक्रेट title=

कोल्हापूर : कोल्हापूरच्या जुनैद जमादार यांच्यातील परिवर्तन पाहून अनेकांना धक्का बसला. कारण 207 किलो वजनाचा जुनैद आता 95 किलोचा झालाय. कोल्हापूरच्या या पठ्ठ्याने तब्बल 112 किलो वजन कमी केलंय. जुनैदने हे कसं केलं. हे जाणून घेणार आहोत. कारण तो अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे. जेव्हा त्याचे वजन वाढले होते तेव्हा तो बाहेर यायला घाबरत होता. आजारी असतानाही रुग्णालयात जात नव्हता. 

'एकदा डॉक्टरांनी सांगितले होते इंजेक्शन दिले तरी ते शरीरात पोहोचणार नाही, कारण मांसाचा थर खूप जाड होता. एवढेच नाही तर माझे वाढलेले वजन पाहून लोक माझी खिल्ली उडवत होते. पण त्याने त्याचा सामना केला आणि 112 किलो वजन कमी करून सर्वांना थक्क केले.

जुनैदचे कपडे शिवण्यासही टेलर नकार द्यायचा. त्याच्या शर्टची साईज 8xl आणि पँटची साईज 64 होती. रेडीमेड कपडे तर मिळतच नव्हते.

डिप्रेशनचा शिकार

जुनैद सांगतो की, मला पाहून लोक विचित्र वागायचे. त्याने मला माणसाप्रमाणे नव्हे तर प्राण्यासारखे वागवले. लोकांच्या कमेंट्स ऐकून मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि सिगारेट, दारू पिऊ लागलो. माझी अवस्था पाहून माझे वडील म्हणाले की तू काही काम करू नकोस, वजन कमी कर. हे सांगताना तो रडत होता, त्यांना माझी वेदना दिसत नव्हती. त्यानंतर मी ठरवले की मी वजन कमी करत राहीन.

लॉकडाऊनमध्ये वजन कमी करण्याचा प्रवास

जुनैद जिममध्ये जाऊ लागला. एक ते दोन आठवड्यात त्याने 8 किलो वजन कमी केले. त्यानंतर त्याला अधिक वजन कमी करण्याची प्रेरणा मिळाली. पहिला एक आठवडा आहारात कोणताही बदल केला नाही. फक्त शरीराला व्यायामाची सवय लावाली. आधी 20 मिनिटे वर्कआउट करायचे. नंतर हळूहळू ते वाढवले.

आहार आणि दिनचर्यामध्ये मोठा बदल

आहारतज्ज्ञांशी संपर्क साधल्यानंतर आहारात बदल केला. पूर्वी तो 12 वाजता उठायचा आणि संध्याकाळी 4 वाजता जेवायचा. मात्र तज्ज्ञाने हा दिनक्रम बदलण्यास सांगितले. यानंतर, तो सकाळी 6 वाजता उठू लागलो आणि 8 वाजता नाश्ता करू लागलो. त्यानंतर 11 वाजता जेवण केले. एका महिन्यात जिम आणि डाएटमुळे 15 किलो वजन कमी झाले.

जुनैदचा वजन कमी करण्याचा दिनक्रम

सकाळी 6 वाजता उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या.
कोरफडीचा रस प्या.
त्यानंतर वर्कआउट.
अडीच तास मसल्स वर्कआउट, वॉर्मअप, कार्डिओ एक्सरसाइज.
मग घरी येऊन 8 वाजता नाश्ता.
नाश्त्यासाठी मसाला ओट्स आणि अंडी
नारळ पाणी सकाळी 12 ते दुपारी 1 दरम्यान
दुपारच्या जेवणात कोशिंबीर, दही, ताक, 1 ते 2 रोटी
दुपारी पुन्हा जिमला
जिमला जाण्यापूर्वी ब्रेडसोबत पीनट बटर.
संध्याकाळी कार्डिओ कसरत
रात्रीच्या जेवणासाठी चिकन आणि सॅलड

वजन कमी करण्याचे रहस्य

जुनैद म्हणतो की त्याचे वजन कमी करण्याचे रहस्य म्हणजे सतत आणि न थांबता व्यायाम करणे. नेहमी सकारात्मक रहा. वजन कमी केल्याने मानसिक आरोग्यही सुधारले आहे. तर अशाप्रकारे जुनैदने 112 किलो वजन कमी केले आणि लोकांची तोंड बंद केली. त्यामुळे तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही त्याच्याकडून प्रेरणा घेऊ शकता. तज्ज्ञांच्या मदतीन तुम्ही वजन कमी करु शकता.