मुंबई : आजकाल पुरुषांमध्ये चुकीची जीवनशैली आणि इतर कारणांमुळे स्पर्म्सची संख्या कमी होण्याची समस्या भेडसावते. पुरुषांमध्ये स्पर्म्सची संख्या कमी असणं याला 'ऑलिगोस्पर्मिया' असं म्हणतात. ज्यावेळी स्पर्म्सची अजिबात निर्मिती होत नाही, तेव्हा त्याला अॅझोस्पर्मिया म्हणतात.
सीमनमध्ये प्रति मिलिलिटर 15 दशलक्ष स्पर्म्सपेक्षा कमी असल्यास, तुमच्या स्पर्म्सची संख्या सामान्यपेक्षा कमी मानली जाते. जर पुरुषामध्ये स्पर्म्सची संख्या कमी असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप कमी होते.
स्पर्म्सची संख्या कमी होण्याचं मुख्य लक्षण म्हणजे गर्भधारणा होण्यात अडचण. याशिवाय इतर कोणतीही चिन्हं किंवा लक्षणे दिसत नाहीत. काही पुरुषांमध्ये, स्पर्म्सची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जसं की, हार्मोन्स बदलणं किंवा स्पर्म्सच्या मार्गात अडथळा येणं.