NPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा

NPPA Medicines News : देशात महत्त्वाची औषधं स्वस्त झाली आहेत. ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त झाली आहेत. 

Updated: Jan 17, 2023, 11:05 AM IST
NPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा  title=
128 medicines cheap including fever diabetes and asthma

NPPA Capping : देशात महत्त्वाची औषधं स्वस्त झाली आहेत. ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त झाली आहेत. (Medicines News in Marathi) अँटिबायोटिक आणि अँटिव्हायरलच्या (Antibiotics and Antivirals) किमती निश्चित करण्याचा निर्णय एनपीपीएने घेतला आहे. कॅन्सर, डायबिटीसची औषधे 40 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. 119 औषधांच्या कमाल किमती निश्चित केल्यानं रुग्णांना दिलासा. तसेच याआधी पॅरासिटामॉलसह 127 औषधं स्वस्त झाली आहेत. (Health News in Marathi)

अमोक्सिसिलिन आणि क्लेव्हुलेनिक अ‍ॅसिड, व्हॅनकोमायसिन, दम्यामध्ये वापरले जाणारे सॅल्बुटामोल, कॅन्सरचे औषध ट्रॅस्टुझुमॅब, वेदना कमी करणारे आयबुप्रोफेन आणि तापासाठी दिलेले पॅरासिटामॉल यांचे प्रतिजैविक इंजेक्शन समाविष्ट आहेत. अधिसूचनेनुसार, Amoxicillin च्या एका कॅप्सूलची किंमत 2.18 रुपये आणि Cetirizine ची किंमत 1.68 रुपये ठेवण्यात आली आहे. पॅरॅसिटॅमोल, एमॉक्सिलिनसह 128 औषधांचा यात समावेश आहे. नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटी कडून मंगळवारी 128 औषधांच्या किंमती ठरवण्यात आल्या आहेत. चालू वर्षामध्ये सतत पाचव्यांदा काही औषधं स्वस्त करण्यात आली आहेत. पॅरॅसिटॅमोल सारखी औषधं यंदाच्या वर्षात दुसर्‍यांदा स्वस्त झाली आहेत. जानेवारी अखेरीस ही स्वस्त औषधं बाजारात उपलब्ध होणार आहेत.

कॅन्सर, डायबिटीस रुग्णांसाठी मोठा दिलासा

कॅन्सर, डायबिटीस, काविळ रुग्णांना सरकारने याआधी मोठा दिलासा दिला. सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीतील 119 औषधांची कमाल किंमत निश्चित केली होती. त्यानुसार कॅन्सर, डायबिटीस, ताप, कावीळसह अनेक गंभीर आजारांवरील औषधांची किंमत 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहेत.  येत्या काळात अत्यावश्यक औषधांमधील आणखी काही औषधांच्या किंमती कमी केल्या जातील अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार आता  ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त करण्यात आली आहेत.

नॅशनल फार्मास्युटिकल्स प्रायझिंग अथॉरिटीच्या बैठकीत या यादीतील 119 प्रकारच्या औषधांची कमाल किंमत निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये तापावरील पॅरासिटामोल, रक्तातील युरिक अॅसिड कमी करणाऱ्या औषधांचा समावेश आहे. 

कॅन्सर, डायबिटीसवरील कोणती औषधं स्वस्त 

कॅन्सर, डायबिटीसवरील औषधं स्वस्त झाली आहेत. यात टॅमोजोलोमाइड, सोफोस्बुविर, लेट्रोजोल  , फ्लुकोनाजोल (प्रति गोळी किंमत) यांचा समावेश आहे.

टॅमोजोलोमाइड 662 - 393  -  40 टक्के

सोफोस्बुविर   741 -  468 - 37 टक्के

लेट्रोजोल   39  -  26  - 37 टक्के

फ्लुकोनाजोल  35  -  26  -  23 टक्के

पॅरासिटामोल     2 -  1.50 -  12 टक्के

आता येथून खरेदीची सक्ती करता येणार नाही!

दरम्यान, आता रुग्णालयांशी संलग्न मेडिकलमधून खरेदीची सक्ती करता येणार नाही. अन्न आणि औषध प्रशासनानं तसं पत्र जाहीर केले आहे. रुग्णालयात कोणी उपचारासाठी दाखल असल्यास, त्याच्या नातेवाईकांना त्याच रुग्णालयातल्या संलग्न मेडिकलमधूनच औषध खरेदी करायला भाग पाडलं जायचं. अनेकदा इतरत्र मेडिकलमध्ये स्वस्तात मिळणारी औषधं रुग्णालयांशी संलग्न मेडिकलमध्ये जास्त किंमतीलाही विकत घ्यावी लागतात. पण आता रुग्णांना याबाबत दिलासा देणारं पत्र अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी जाहीर केले आहे. संलग्न मेडिकलमधून औषधांची खरेदी बंधनकारक नाही. कोणत्याही नोंदणीकृत मेडिकलमधून औषधं खरेदी करता येऊ शकतात. तसा फलक लावणंही रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आलाय.