Men Health Tips: प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येण्याच्या समस्येने त्रास आहात? तर हे उपाय करा

पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येणं ही एक सामान्य समस्या आहे. बहुतेक पुरुष या समस्येने चिंतित आहेत. खरंतर प्रायव्हेट पार्ट स्वच्छ न ठेवल्यामुळे या ठिकाणी खाज येण्याची समस्या उद्भवते.

Updated: Jun 8, 2022, 10:05 PM IST
Men Health Tips: प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येण्याच्या समस्येने त्रास आहात? तर हे उपाय करा title=

मुंबई : पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येणे ही एक सामान्य समस्या आहे. बहुतेक पुरुष या समस्येने चिंतित आहेत. खरंतर प्रायव्हेट पार्ट स्वच्छ न ठेवल्यामुळे या ठिकाणी खाज येण्याची समस्या उद्भवते. जे पुढे जाऊन बऱ्याचदा संसर्गाचं रूपही घेतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जननेंद्रियाच्या क्षेत्राची काळजी घेतली पाहिजे. बरेच लोक अशा समस्या डॉक्टरांकडे कशा घेऊन जाव्यात म्हणून लाज बाळगतात. म्हणून ते डॉक्टरांकडे जात नाहीत, परंतु हे लक्षात घ्या की, समस्या जास्त गंभीर असली तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. परंतु हे होऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न करु शकता.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स देणार आहोत, ज्या तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळवून देण्यासाठी मदत करतील.

जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर ही माहिती जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.

पुरुषांच्या खाजगी भागात खाज येण्याची कारणं

1-प्रायव्हेट पार्ट व्यवस्थित स्वच्छ ठेवले नाही कर खाज येते.
2- प्रायव्हेट पार्टमध्ये आर्द्रता असल्यास किंवा घाम येत असल्यास खाज सुटणे देखील होऊ शकते.
3-यीस्ट संसर्ग किंवा बुरशीच्या संसर्गामुळे खाज सुटू शकते.
4- हार्ड केमिकल असलेल्या साबणाने प्रायव्हेट पार्ट धुतल्याने खाज सुटू शकते.
5- एकच अंडरवेअर जास्त वेळ घालत राहिल्यास प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येण्याची समस्या उद्भवू शकते.

प्रायव्हेट पार्टला खाज सुटल्यास पुरुषांनी काय करावे?

1- जर तुम्ही प्रायव्हेट पार्टला खाज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही टी ट्री ऑइल वापरू शकता. कारण टी ट्री ऑइलमध्ये अँटी फंगस असतात. यामुळे फंगल इन्फेक्शनची समस्या दूर होते.

2- जर तुम्हाला प्रायव्हेट पार्टला खाज येत असेल, तर तुम्ही पाण्यात बेकिंग सोडा टाकून अंघोळ करू शकता. बेकिंग सोड्याचे फायदे असे आहेत की, ते इन्फेक्शन आणि त्वचेच्या समस्या दूर करते. यासाठी आंघोळीच्या पाण्यात एक चतुर्थांश कप बेकिंग सोडा पावडर टाका आणि 10 मिनिटांनंतर त्या पाण्याने आंघोळ करा. असे केल्याने प्रायव्हेट पार्टमधील खाज येण्याची समस्या दूर होईल.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)