ब्लु लाईटचा शरीरावर कसा होतोय परिणाम..जाणून व्हाल हैराण

फोन, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून बाहेर येणारा  ब्लु लाईट त्वचेच्या पेशींवर परिणाम घडवतात.

Updated: Nov 5, 2022, 03:23 PM IST
ब्लु लाईटचा शरीरावर कसा होतोय परिणाम..जाणून व्हाल हैराण  title=

mobile blue light effect: आजकाल लहान असो व मोठे प्रत्येकाकडून  मोबाईलचा वापर कारण सर्रास झालाय. आपण कितीतरी जण रात्री-रात्री मोबाईल पाहत जागत काढतो. स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळ्यांना आणि त्वचेलाही हानी पोहोचते.  एका संशोधनानुसार, फोन, लॅपटॉप आणि टीव्हीच्या ब्राईट स्क्रीनमुळे युझरच्या डोळ्यांशिवाय त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. पण तुम्हाला माहित आहे का याचा परिणाम तुमच्या डोळ्यांवर पडून तुम्ही अकाली वृद्ध होऊ शकता. 

आणखी वाचा:  जुन्या नाण्यांना बाजारात मिळतेय इतकी रक्कम..बनवतील तुम्हाला श्रीमंत 

यासाठी एक एक्सपेरिमेंट करण्यात आला . काही माशांवर याचा  परिणाम जाणून घेण्यासाठी काही टेस्ट केल्या आहेत. माशांवर ब्लु लाईटचा प्रभाव जाणून घेण्यासाठी, त्यांना 2 दिवस, 20 दिवस, 40 दिवस आणि 60 दिवस गडद निळ्या प्रकाशाखाली ठेवण्यात आले.  यानंतर माशांच्या मायटोकॉन्ड्रियावर ब्लु परिणाम तपासण्यात आला.  संशोधनानुसार, माशांच्या डोळ्यांवर तर ब्लु लाईटचा परिणाम दिसून आलाच त्याच्याशिवाय माशांच्या स्किनवरसुद्धा परिणाम दिसून आला. 

आणखी वाचा: Tulsi Vivah 2022 Upay: तुमचं जोडीदारासोबत पटत नाही ? तुळशीविवाहाच्या दिवशी करा हे उपाय.. 

ब्लु लाईट आणि स्कीनचा संबंध

फोन, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून बाहेर येणारा  ब्लु लाईट त्वचेच्या पेशींवर परिणाम घडवतात.  जसे की त्वचेच्या पेशी कमी होऊ शकतात किंवा काहीवेळा या पेशी नष्टही होऊ शकतात, हे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे. पेशींमधील हे बदल तुम्हाला वयाच्या आधीच म्हातारे बनवू शकतात.

संशोधनानुसार, जर तुम्ही एका तासापेक्षा जास्त काळ ब्लु लाईटच्या संपर्कात असाल तर ते तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये बदल करू लागते. त्यामुळे अनेक वेळा त्वचेवर काळे डागही पडतात.  जास्त ब्लु लाईटच्या संपर्कात आल्याने डोळ्यांमध्ये लालसरपणा, सूज आणि कोरडेपणा येऊ शकतो.