कोरोनाचं थैमान शमलं नसताना, म्युकरमायकोसीसचा प्रकोप सुरू; संसर्गापैकी 50 टक्के मृत्यू

कोरोना विषाणूमुळे आधीच हैराण झालेले नागरिक आता वेगळ्याच आजारामुळे चिंतीत आहे. 

Updated: May 12, 2021, 02:12 PM IST
कोरोनाचं थैमान शमलं नसताना, म्युकरमायकोसीसचा प्रकोप सुरू; संसर्गापैकी 50 टक्के मृत्यू

नवी दिल्ली :  कोरोना विषाणूमुळे आधीच हैराण झालेले नागरिक आता वेगळ्याच आजारामुळे चिंतीत आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्यापही शमलेली नाही. देशात कोरोना रुग्णांची संख्या काहीशी कमी होत आहे. तरी म्युकरमायकोसीसच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक आहे. 

50 टक्के रुग्णांचा मृत्यू

म्युकरमायकोसीसचा कहर देशातील तीन राज्यांमध्ये जास्त आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये म्युकरमायकोसीसने आता हात पाय पसरायला सुरूवात केली आहे. या आजाराने ग्रस्त झालेल्या रुग्णांपैकी आतापर्यंत 50 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यांना म्युकरमायकोसीसच्या रुग्णांकडेही लक्ष केंद्रीत केले आहे.

म्युकरमायकोसीसचे रुग्ण वाचले तरी त्यांच्या नजर कमी होणे किंवा बाद होणे, ताप, नाक, डोके दुखने आदी त्रास होत असल्याची माहिती समोर येत आहे.

गुजरातच्या राजकोटमध्ये म्युकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी वेगळे वॉर्ड तयार करण्यात आले आहे.