मुंबई : दही हे आपल्या शरीरासाठी खूपच चांगले आहे. ते आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करते. तसेच त्याच्या अनेक चांगल्या गुणधर्मामुळे डॉक्टर देखील त्याला खाण्याचा सल्ला दिला जातो. दही खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय दात आणि हाडे मजबूत होतात. याशिवाय तुमचे हृदयही निरोगी राहते. परंतु असे असले तरी तुम्हाला हे माहित आहे का, की सगळ्याच वस्तुसोबत दही खाणे चांगले नाही. दही आपल्या शरीरासाठी कितीही चांगलं असलं तरी, जर तुम्ही काही विशिष्ट गोष्टीसोबत दही खाल्लात तर हा दही तुमच्या शरीरासाठी विष म्हणून काम करतं.
चला तर मग जाणून घेऊ या की, कोणत्या वस्तुसोबत दही खाणं शरीरासाठी चांगलं नाही.
अनेकांना दही आणि कांदा मिसळून खायला आवडते. जर तुम्हाला देखील असंच खाण्याची सवय असेल तर, आताच सावध व्हा. कारण हे तुमच्या शरीराला हानी पोहोचवण्याचे काम करते.
दही आणि मासे एकत्र खाऊ नयेत, असे तज्ज्ञ सांगतात. याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. हे पदार्थ तुम्ही एकत्र खाण्याचा प्रयत्न केल्यास अपचन, पोटदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
दही शरीरात शीतलक म्हणून काम करते. त्यात काही गरम असलेले पदार्थ घालून खाण्याचा प्रयत्न केला, तर ते शरीराला नुकसान पोहोचवते. थंड आणि गरम एकत्र खाल्ल्याने दातांचे नुकसान देखील होऊ शकते.
आंबा आणि दूध घालून बनवलेला मँगो शेक उन्हाळ्यात बरेच लोक आवडीने पितात. पण जर तुम्ही दही मिसळून आंबा खाण्याचा विचार करत असाल, तर ही चूक अजिबात करू नका. दही आणि आंबा खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते.
दही आणि उडीद डाळ एकत्र खाणे हानिकारक आहे. त्यामुळे शरीरात अॅसिडिटी, फुगणे, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला खायचे असेल, तर त्या दोघांमध्ये थोडा वेळ अंतर ठेवा आणि मग खा.