Weight Loss Tips: फळे आरोग्यासाठी चांगली असतातच पण या फळांचे आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहिती नसतात. पपई उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावू नये की थंडीत खावी याबाबत नेहमीच चर्चा होत असते. मात्र, पपई खाण्याचे तुम्हाला फायदे माहीत आहेत का? पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर तो लवकर बरा होता. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'क' असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते. (Weight Loss Fruit)
ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव (Dr. Ayushi Yadav) यांनी सांगितले की, पपईमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात आढळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पपई खाल्ल्यामुळे वजण कमी होण्यास मदत होते. (Weight Loss Tips)
आहारात पपईचा समावेश कसा करावा
सकाळी नाश्त्यापासूनच पपई खाण्यास सुरुवात करा. तुम्ही पपईचे सलाड खाऊ शकता, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळतील. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याचे सेवन ओट मीलसोबतही करू शकता. (Papaya For Weight Loss)
दुपारचं जेवण
दुपारच्या जेवणात पपईची कोशिंबीर देखील खाऊ शकता, त्यात पालक, टोमॅटो, मीठ, लसूण आणि लिंबाचा रस घातल्यास पौष्टिकतेत लक्षणीय वाढ होईल. जर तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल तर तुम्ही पपईचा रस देखील पिऊ शकता, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.
संध्याकाळचा आहार
संध्याकाळी देखील तुम्ही पपई खाऊ शकता. पपई आणि अननस एकत्र करून स्मूदी बनवा. यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही.
रात्रीचं जेवण
रात्रीचं जेवणामध्येही तुम्ही पपईचा समावेश करू शकता. रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ म्हणूनही पपई फळाचे सेवन केले जाते. यामुळे केवळ चरबी कमी होणार नाही आणि शरीराला डिटॉक्स करण्यास देखील मदत होईल. ( Weight Loss Food)