ड्रग्सच्या व्यसनापेक्षाही भयंकर आहे 'हे' व्यसन!

लोक हळूहळू याच्या इतके आहारी जातात की इच्छा असूनही पॉर्न पाहणे सोडणे शक्य होत नाही. 

Updated: Jul 4, 2018, 09:05 AM IST
ड्रग्सच्या व्यसनापेक्षाही भयंकर आहे 'हे' व्यसन! title=

मुंबई : साधारणपणे 30% महिला आणि 50% पुरुषांना पॉर्न पाहण्याचे व्यसन आहे. हे लोक हळूहळू याच्या इतके आहारी जातात की इच्छा असूनही पॉर्न पाहणे सोडणे शक्य होत नाही. भारतात किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आणि तरुणाईत पॉर्न पाहण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. काही वर्षांपूर्वी पॉर्न पाहणाऱ्या देशात भारताचा दहावा नंबर होता तर आता भारताने तिसरा नंबर गाठला आहे.

मानसिक तणाव

पॉर्न पाहणारी व्यक्तीला हळूहळू एकटेपणा जाणवू लागतो. मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. एक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, अधिकतर पॉर्न पाहणारे लोक मानसिक रुग्ण आहेत.

मेंदूचे आकूंचन

संशोधनातून सिद्ध झाले आहे की, पॉर्न पाहुन मेंदू आंकुचन पावतो. मेंदूचे स्ट्रेटम छोटे असल्यास नुकसानकारक ठरते. 

ऑक्सीटोसिन हार्मोनची कमतरता

मेंदूत स्त्रवणारे ऑक्सीटोसिन हार्मोन एक शक्तीशाली हार्मोन आहे. याला लव हार्मोन देखील म्हणतात. पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये लव हार्मोनची कमतरता दिसून येते. 

समाधान मिळत नाही

पॉर्न पाहणाऱ्या व्यक्ती खऱ्या आयुष्यातही त्याप्रमाणे सेक्सची अपेक्षा करतात. जे खऱ्या आयुष्यात शक्य नाही. त्यामुळे सेक्समधून समाधान मिळत नाही.

लैगिंक आजार (सेक्सुअल डिजीज)

पॉर्न पाहणाऱ्या लोकांमध्ये एक्स्ट्रा अफेअर करण्याची प्रवृत्ती बळावते. त्यामुळे लैगिंक आजारांचा धोका वाढतो.