मुंबई : फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्याप्रमाणे कच्चा पपई खाणेही आरोग्यासाठी चांगले आहे. कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात. त्यामुळे कच्चा पपई खाणे केव्हाही चांगले. कच्चा पपई खाणार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात, भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलडमध्ये वापरून करु शकता.
- कच्चा पपईमध्ये असलेली जीवनसत्वे आपल्याला अनेक रोगांपासून संरक्षण देतात. कच्च्या पपईचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील इंस्युलीनचे प्रमाण वाढविण्याचे काम कच्ची पपई करीत असते. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- कच्च्या पपईचे सेवन नियमित करणाऱ्यांना कोलन किंवा प्रोस्टेटचे कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. कच्ची पपई वजन घटविण्याच्या मदत करते. ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांनी दररोज जेवणासोबत कच्च्या पपईचे सेवन करावे. त्यामुळे शरीरामध्ये साठलेल्या अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. कच्च्या पपईचे सेवन करण्यासाठी कच्ची पपई किसून घेऊन तो कीस दह्यामध्ये घालून खाल्ला जाऊ शकतो. कच्च्या पपईचे सेवन सॅलडसोबतही केले जाऊ शकते.
- युरीन इन्फेक्शनची समस्या असेल, तर त्यासाठी कच्ची पपई लाभदायक आहे. कच्च्या पपईने इन्फेक्शन रोखले जाऊन ते निर्माण करणाऱ्या बॅक्टेरीयांनाही आळा बसतो. जर सांधेदुखी सतावत असेल, तर ती कमी करण्यासाठी कच्ची पपई लाभकारी आहे.
- कच्च्या पपईच्या सेवनाने लिव्हर देखील निरोगी राहते. तसेच ज्या महिला आपल्या नवजात अर्भकांना स्तनपान करवीत असतील, त्यांच्यासाठी देखील कच्च्या पपई खाणे चांगले असते. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे मिळतात. आईचे दूध वाढविण्यासाठी कच्ची पपई खूप उपयोगी ठरते.